भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पुढील चार दिवस “या” भागात मुसळधार पावसाची  शक्यता

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशातील पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवलेला आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. महाराष्ट्रात देखील दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसापासून काही भागात पुन्हा एकदा चांगली हजेरी लावलेली आहे. पण तरीसुद्धा अद्यापही महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी शेतकरी राजा हा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात आहे. जुलै महिन्याचा शेवट जवळ येत असला तरी अद्यापही म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परंतु मुंबईसह मुंबई उपनगरात, ठाणे, कोकण, विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. तर आता हवामान विभागाने देखील पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर, सातारा, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्यांना वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

दुसरीकडे मात्र मराठवाड्यामध्ये अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले असले तरी अद्यापही काही भागांमध्ये पाऊस न पडल्याने विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यात तब्बल 44 टक्के पेरण्या अद्यापही पाऊस न पडल्याने खोळंबल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, त्या देखील पावसाअभावी हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे. पण काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. ज्या भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. त्या ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!