राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते मध्यम पाऊस
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाचे पहिले दोन दिवस वादळी ठरले, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकोंमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना दुसरीकडे पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रुपांतर झाल्याने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता हवामान ख्यात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे. पावसामुळे आधिच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
विदर्भाच्या काही भागात हवामान खात्याकडून ॲारेंज अलर्ट
विदर्भात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. नागपूर हवामान विभागाकडून विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाप्रमाणेच राज्याच्या इतर भागात देखील पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात जोरदार बसरणार पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत आजपासून 22 ऑगस्टला प्रामुख्याने घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.