भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

महाराष्ट्रात 2021 मध्ये सर्वाधिक गुन्हे; यूपी,बिहारला टाकलं मागे, मुंबईत देशात सर्वात जास्त गुन्हे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात आता गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. 2021 च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोविडच्या दुसऱ्या वर्षात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन यामुळेही यातील अनेक गुन्ह्यांची नोंद झाली असावी.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही मोठी राज्ये आहेत ज्यात प्री-कोविड 2019 आणि 2021 दरम्यान नोंदणीकृत गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, 2019 आणि 2021 मधील गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली शहरे चेन्नई (154%) आणि मुंबई (56%) आहेत. राज्यानुसार बघायचं झाल्यास, 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (3.67 लाख) गुन्हे झाले, त्यानंतर उत्तर प्रदेशात (3.58 लाख) होते.

देशाच्या आर्थिक राजधानीला केवळ कोविड महामारीचा फटका बसला नाही तर २०२१ मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. शहरात दररोज बलात्कार, अपहरण, खून अशा हिंसक प्रकरणांचे किमान 14 गुन्हे दाखल होतात. अहवालात नोंदवल्याप्रमाणे 2021 मध्ये मुंबईत गुन्ह्यांमध्ये 27% (63,689 प्रकरणे) वाढ झाली आहे. 2020 मध्ये हा आकडा 50,158 आणि 2019 मध्ये 40,684 इतका होता.

पोलिसांनी असे सांगितले की, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे तसंच महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचे अहवाल कमी झाले आहेत. पण सायबर क्राईम वाढले आहेत आणि त्यामुळे बनावटगिरी आणि फसवणूकही वाढली आहे.

2021 मध्ये मुंबईत चोरीचे 7820 गुन्हे, खोटे बोलणे, फसवणुकीचे 4899, अतिवेगाने वाहन चालवण्याचे 2282, अपहरणाचे 1590, लैंगिक छळाचे 401, निष्काळजीपणामुळे मृत्यूचे 386, खूनाचे 162 गुन्हे नोंदवले गेले आहेत.

राज्यानुसारही 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, ओडिशा यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र प्रतिलाख लोकसंख्येच्या तुलनेत गुन्ह्यांच्या प्रकरणांच्या बाबतीत 10 व्या स्थानावर आहे. तर दिल्ली या यादीत अव्वल आहे. दिल्लीपाठोपाठ तामिळनाडू आणि त्यानंतर केरळचा क्रमांक लागतो. गुजरात आणि हरियाणा चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

मात्र, देशात एकूण ३,६७,२१८ गुन्ह्यांची महाराष्ट्रात झाली असल्याने आकडेवारीनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. युपी ३,५७,९०५ गुन्ह्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. . महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे मुंबईत आहेत, तर नागपूर आणि पुणे 6 व्या आणि 14 व्या स्थानावर आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!