भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशिभविष्य ; कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष– तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. लांबच्या प्रवासाचा योग आहे. इतरांची मनं ओळखायला शिका.


वृषभ– कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. नवं घर खरेदी करण्याची योजना आखाल. आर्थिक नियोजनाचा फायदा होणार आहे.


मिथुन– व्यापारात भरभराट होणार आहे. गृहकलह संपणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे.


कर्क– मनात असणाऱ्या सर्व चिंता मिटणार आहेत. अभ्यासावर लक्ष द्या. खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा.


सिंह– कर्जानं घेतलेले पैसे फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत.


कन्या– मोठ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. नवं वाहन खरेदी कराल. नातेसंबंध सुधारणार आहेत.


तुळ– नव्या कामांचा फायदा तुम्हाला होणार आहे. महागडी भेटवस्तू मिळू शकते. विचारपूर्वक गुंतवणूक करा.


वृश्चिक– नात्यांमध्ये सावध राहा. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. कोणाशीही वाद घालू नका.


धनु– मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. घर स्वच्छ ठेवा. सकारात्मकता नांदेल.


मकर – नोकरीमध्ये बदल करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. कर्जाऊ पैसे परत मिळणार आहेत.


कुंभ – सायंकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळणार आहे. महत्त्वात्या वस्तू सांभाळा. मित्रांची साथ मिळणार आहे.


मीन– दुपारपर्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करा. अचानक एखादी दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!