भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज शुक्रवार २९ डिसेंबर २०२३,प्रेमाने समस्या सोडवा.खर्च वाढेल,स्वतःच्या हिमतीवर प्रश्न सोडवाल.कामात अडचणी येतील

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शुक्रवार २९ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष –
सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवता येईल. तुमची प्रतिष्ठा नव्याने तयार करावी लागेल. नम्रपणे वागा.

वृषभ –
वरिष्ठांच्या नाराजीचे कारण शोधा. खर्च वाढेल. प्रवासात सावधपणे वाहन चालवा. जिद्द ठेवा.

मिथुन –
अडचणीतून मार्ग काढा. मोठ्या लोकांची मदत मिळेल. तुमची प्रगती सर्वांच्या इच्छेनुसार होईल.

कर्क –
आवडत्या विषयात रमून जाल. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.

सिंह –
दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीत जबाबदारी वाढेल. स्पर्धेत प्रगतीची संधी मिळेल.

कन्या –
वडीलधार्‍या व्यक्तींची काळजी वाटेल. प्रेमाने समस्या सोडवा. मित्राची मदत घेता येईल.

तूळ –
आनंदी रहाल. मौज-मजेत वेळ घालवाल. ठरविलेले कठीण कामसुद्धा पूर्ण करता येईल.

वृश्चिक –
कामात अडचणी येतील. चिडचिड करू नका. प्रवासात सावध रहा. खर्च फुकट जाण्याची शक्यता.

धनु –
मुलांचा सहवास आनंद देईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. धंद्यात लक्ष द्या. यश मिळेल.

मकर –
क्षुल्लक कामात राग वाढवू नका. थोरा मोठ्यांचे सहकार्य मिळेल. स्पर्धेत तुमचा नंबर लागेल.

कुंभ –
स्वतःच्या हिमतीवर प्रश्न सोडवाल. तुमचे स्थान पक्के होईल. प्रेमात यश जिंकाल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

मीन –
धंद्यातील समस्या कमी होईल. नोकरवर्ग नवीन मिळेल. स्वतःच लक्ष द्या. एकच काम नीटपणे करा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!