राशीभविष्य : आज शुक्रवार ८ डिसेंबर २०२३, आर्थिक बाजू चांगली असेल,घाई घाईने निर्णय घेणं टाळा, चांगली बातमी मिळेल,खर्चावर नियंत्रण ठेवा,प्रलंबित प्रकरण मार्गी लागतील,मोहात पडू नका
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शुक्रवार ८ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष (Aries) :
कामात अनिश्चितता राहू शकते. उद्योग व्यवसायात सातत्य राहील. आर्थिक बाजू चांगली असेल. नवीन लोकांच्या भेटी होतील, पण भेटीदरम्यान सावध भूमिका घ्या. महत्त्वाचे मुद्दे अनुकूल राहतील. करार पुढे सुरू ठेवा. कामाची परिस्थिती अनुकूल राहील.उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा.
वृषभ (Taurus) :
करिअर ट्रेडिंगमध्ये सातत्य वाढवा. स्मार्ट पद्धतीने काम करा. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. करिअर, व्यवसायात अनुकूलता राहील. कागदोपत्री सुधारणा दिसेल. क्षमतेपेक्षा जास्त जोखीम पत्कराल. पण यामुळे नुकसान होणार नाही.उपाय : उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
मिथुन (Gemini) :
आर्थिक व्यवहारात घाई टाळा. ऑफिसमध्ये विरोधक सक्रिय झाल्याने त्रास होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्य ठेवा. शिस्तीने पुढे जा. सक्रियपणे केलेल्या कामात यश मिळेल. यंत्रणा सुरळीत राहील यावर भर द्या.उपाय : कुत्र्याला तेल लावलेली चपाती द्यावी. श्री गणपतीला दुर्वा अर्पण करा.
कर्क (Cancer) : व्यापार-उद्योगात व्यावसायिक कामं जलदगतीने पूर्ण कराल. क्षमतेपेक्षा मोठी कामं करण्याचा प्रयत्न कराल. मात्र अशी कामं करताना पुरेशी काळजी घ्या. समकक्ष व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आर्थिक विकासाच्या संधीचा फायदा घ्या.
सिंह (Leo) :
आर्थिक बाबी सामान्यापेक्षा चांगल्या राहतील. निष्ठेने काम पूर्ण कराल. भावनिकतेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या योजना शेअर करणं टाळा. कामकाज यंत्रणा मजबूत होईल. सर्व बाजूंनी समान पाठिंबा मिळेल. सेवाक्षेत्रातील कामावर लक्ष केंद्रित कराल. सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्याल.उपाय : श्री शिवचालिसा पठण करा.
कन्या (Virgo) :
ऑफिसमध्ये प्रोफेशनल सहकाऱ्यांवर विश्वास ठेवाल. तुम्ही आणि वरिष्ठ यांच्यात योग्य ताळमेळ राहील. मोहात पडू नका. संयम आणि धैर्याने पुढे जा. पारंपरिक उद्योग व्यवसाय उभारणीचा विचार मनात येईल. धैर्य आणि पराक्रमाने स्वतःचं स्थान कायम राखाल.उपाय : श्री सरस्वती देवीची पूजा करा.
तूळ (Libra) :
व्यवसायात अग्रणी राहाल. आर्थिक प्रगती झाल्यामुळे उत्साह वाढेल. मनात स्पर्धेची भावना असेल. व्यावसायिक लोकांना अधिक यश मिळेल. कामात व्यस्त राहाल. वडिलोपार्जित कामांना वेग येईल. टॅलेंटला चालना मिळेल. आर्थिक बचत होईल.उपाय : पांढऱ्या वस्तू दान करा.
वृश्चिक (Scorpio) :
कामाच्या ठिकाणी वाटचाल सुरळीत राहील. नोकरी, व्यवसाय चांगला असेल. व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न अनुकूल ठरतील. प्रवासाची शक्यता आहे. चांगली बातमी मिळेल. सुविधांमध्ये वाढ होईल. सर्जनशील विषयासाठी वेळ द्याल. व्यावसायिक प्रयत्नांमध्ये सक्रियता राखाल.उपाय : गरीब, गरजू व्यक्तीला लाल फळं दान करा वेळ द्याल. व्यावसायिक प्रयत्नांमध्ये सक्रियता राखाल.उपाय : गरीब, गरजू व्यक्तीला लाल फळं दान करा.
धनू (Sagittarius) :
कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव असेल. नोकरी, व्यवसायात संयम दाखवाल. नातेसंबंधांमुळे फायदा होईल. लाभाच्या संधी वाढतील. परिस्थिती सकारात्मक राहील. व्यावसायिक संतुलन राखाल. पुढील योजनांवर काम सुरू कराल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्याल.
मकर (Capricorn) : व्यवसायात चांगले करिअर होईल. प्रलंबित प्रकरणं मार्गी लागतील. सकारात्मकता वाढेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. स्पर्धा टाळा. दिनचर्येची काळजी घ्या. नवीन ऑफर्स येतील. व्यवहारात कर्ज घेणं टाळा. लेखनात चुका करू नका. करारात स्पष्टता येईल.उपाय : भगवान श्री शंकराला जल अर्पण करा.
कुंभ (Aquarius) :
धोरणात्मक नियामांचे भान राखा. व्यावसायिक हितसंबंध जोपासण्यावर भर द्या. नोकरी, व्यवसायात आत्मविश्वास राहील. यंत्रणा सुरळीत ठेवण्यावर भर द्या. व्यावसायिकांसाठी वातावरण सामान्य असेल. उद्योग आणि व्यापाराच्या कामात सुधारणा होईल. ध्येयप्राप्तीसाठी समर्पित भावनेनं काम करा. निकोप स्पर्धा करा.उपाय : प्रभू श्रीरामाची आरती करा.
मीन (Pisces) :
व्यवसायात आघाडीवर राहाल. धोरणात्मक नियमांचे पालन करा. आधुनिक पद्धतीने केलेल्या प्रयत्नांना गती मिळेल. लाभ होतील. आर्थिक बाबतीत संयम दाखवाल. घाईघाईने निर्णय घेणं टाळा. प्रयत्नांना गती येईल. करिअर उत्तम राहील.उपाय : गरीब, गरजू व्यक्तीला अन्नदान करा. श्री हनुमानचालिसा पठण करा.