राशीभविष्य : आज शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२३. रागावर ताबा ठेवा. मान-प्रतिष्ठा वाढेल. यश मिळवाल. नम्रता ठेवा. कठोर बोलू नका.
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष :-
कठीण प्रश्नावर तोडगा शोधता येईल. नवे परिचय होतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नम्रता ठेवा.
वृषभ :-
धंद्यात फायद्याची चर्चा करता येईल. ओळखीतून काम मिळेल. आळस न करता तुम्ही प्रयत्नाने पुढे जाल.
मिथुन :-
कोर्टाच्या कामात योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. हायब्लड प्रेशरचा त्रास वाढू शकतो. मनावर दडपण येईल.
कर्क :-
महत्त्वाचे काम करून घ्या. तुम्हाला नवे काम मिळेल. घरातील तणाव कमी होईल. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा.
सिंह :-
राजकारणात तुमच्यावर आरोप होईल. जवळचे लोक तुम्हाला मदत करतील. विरोध करणारे मैत्री करतील.
कन्या :-
तुमच्या कार्याला दिशा मिळेल. घर, जमीन यासंबंधी समस्या सोडवा. कोर्ट केस जिंकाल. कौतुक होईल.
तूळ :-
मन उदास होईल. चौफेर मनावर दडपण आणणारे वातावरण आहे असे वाटेल. कठोर बोलू नका.
वृश्चिक :-
तुमचा उत्साह वाढेल. कठीण काम करून घ्या. मान-प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात सुधारणा होईल.
धनु :-
शेजारी तुमच्या गतीवर टीका करतील. पैशांच्या व्यवहारात सावध रहा. मौल्यवान वस्तू सांभाळा. फसगत टाळा.
मकर :-
महत्वाचे काम करून घ्या. वाहनासंबंधी समस्या येऊ शकते. धंद्यातील तणाव कमी होईल. चर्चा करता येईल.
कुंभ :-
किरकोळ कारणाने डोके गरम होईल. रागावर ताबा ठेवा. घरात तणाव, वाद होईल. वाहन जपून चालवा.
मीन :-
रेंगाळलेली कामे करून घ्या. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. मान-प्रतिष्ठा मिळेल. यश मिळवाल.