राशीभविष्य : आज सोमवार २५ डिसेंबर २०२३,कसा असेल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार २५ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष :-
धाडस वाढेल. नव्या विचाराने प्रेरीत व्हाल. डावपेच टाकता येईल. भेट घेण्यास व चर्चा करण्यात यश मिळेल.
वृषभ :-
धंदा मिळेल. किरकोळ वाद भागीदाराबरोबर होऊ शकतात. थकवा वाटेल. धावपळ होईल.
मिथुन :-
वरिष्ठांना सांभाळून घ्यावे लागेल. धंद्यासाठी नवा विचार सुचेल. मित्रांचा सहवास मिळेल. प्रवासात ओळख वाढेल.
कर्क :-
प्रतिष्ठा टिकवता येईल. धंद्यात नोकरवर्गाला त्रास होऊ शकतो. कोर्ट केसमध्ये बोलताना काळजी घ्या.
सिंह :-
घरातील मतभेद मिटवता येतील. वरिष्ठांना तुमचे मत पटवून देता येईल. तुमचा दिवस चांगला असेल.
कन्याः-
नित्य नियमाचा क्रम व्यवस्थित पार पाडता येईल. अधिकाराचा उपयोग करून घेता येईल.
तूळ :-
आजचे काम आजच करून घ्या. धंदा मिळेल. स्पर्धा आकर्षक झाल्याने उत्साह वाढेल. प्रवास घडेल.
वृश्चिक :-
नवा विचार धंद्यात उपयोगी पडेल. नावलौकिक मिळेल. वरिष्ठ व सहकारी तुमची मदत करतील.
धनु :-
आक्रमक पवित्रा राजकीय-सामाजिक क्षेत्रात घेता येईल. कामात यश मिळेल. प्रयत्नांना चालना मिळेल.
मकर :-
आजच्या दिवसात मन उदास राहील. कोणत्याही क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्या. फायदा होईल.
कुंभ :-
कामाचा व्याप सांभाळून घेता येईल. आप्तेष्ठांच्या भेटीत महत्वाची बातमी मिळेल. खरेदी कराल.
मीन :-
तुमचे वर्चस्व सामाजिक क्षेत्रात वाढेल. धंद्यात चांगला फायदा होईल. पाहुण्यांच्यासाठी खर्च करावा लागेल.