भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज सोमवार ९ आक्टोबर २०२३. आत्मविश्वास वाढेल. संयमाने वागा. वाहन जपून चालवा,प्रतिष्ठा वाढेल

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार ९ आक्टोबर २०२३, आज एकादशी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग!ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष :
तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. धंद्यात वाढ होईल. मोठे कंत्राट मिळवा. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

वृषभ :
प्रवासात घाई करू नका. महत्त्वाचे काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. रागावर ताबा ठेवा.

मिथुन :
नोकरीत तणाव होईल. कामात चूक करू नका. प्रवासात घाई नको. संयमाने वागा. कलेत मन रमेल.

कर्क :
प्रतिष्ठा सांभाळता येईल. धंद्यातील चर्चा संयमाने करा. विरोधकांना तुमच्या बाजूने वळवता येईल. स्पर्धा जिंकाल.

सिंह :
ताणतणावाचा सामना करावा लागेल. मन स्थिर ठेवता येईल. अवमान होणार नाही याकडे लक्ष ठेवा. धंदा वाढेल.

कन्या :
विरोधकांना शह देण्यासाठी तुमचा उपयोग वरिष्ठ करतील. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात दुर्लक्ष करू नका.

तूळ :
जमीन, घर या संबंधी कामे निर्माण होतील. पोटाची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक :
घरातील कामे होतील. कार्याला वेग येईल. धंद्यात गोड बोला. नवीन ओळखी होतील. प्रतिष्ठा मिळेल.

धनु :
प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख होईल. प्रतिष्ठा मिळेल. गैरसमज होईल. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा.

मकर :
महत्त्वाचे काम रेंगाळत ठेवू नका. योग्य निर्णय घेता येईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. धंदा मिळेल.

कुंभ :
आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. किरकोळ कारणाने गैरसमज निर्माण होईल. नोकरीत काम वाढेल.

मीन :
महत्त्वाचे काम होईल. केस जिंकाल. चर्चा यशस्वी होईल. बोलताना वाहवत जाऊ नका.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!