राशीभविष्य : आज सोमवार ४ सप्टेंबर २०२३. तिसरा श्रावणी सोमवार या राशींसाठी भाग्याचा ठरणार
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार ४ सप्टेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष : कामातील अडचणी कमी होतील. घरात शुभ समाचार मिळेल. मुलांची प्रगती होईल. जीवनसाथीला खूश कराल.
वृषभ : अडचणीवर विजय मिळवावा लागेल. खर्च वाढेल. घरातील कामे वाढतील. नोकरीत कामाकडे लक्ष द्या.
मिथुन : राजकारणात चांगले पद मिळेल. दिग्गज लोकांचा सहवास मिळेल. जुने मित्र भेटतील. धंदा नीट करा.
कर्क : विरोध सहन करावा लागेल. वृद्ध माणसाची काळजी वाढेल. नोकरीत कामाचा ताण होईल.
सिंह : चर्चा सफल होईल. वाटाघाटीत कदाचित थोडे कमी मिळेल प्रसिद्धी मिळेल. चिंतनात मन रमेल.
कन्या : घराच्या संबंधी कामे निघतील. वृद्ध व्यक्तीचा सहवास मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.
तूळ : धंद्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. थकबाकी वसूल करा. कठीण काम करून घ्या. पदाधिकार मिळेल.
वृश्चिक : मनाची द्विधा अवस्था होईल. कोणतीही चर्चा करताना सौम्य धोरण ठेवा. शब्द जपून वापरा.
धनु : नोकरीत कायद्याचे पालन करा. निर्णय घेण्याची घाई करू नका. व्यवहारात दादागिरी करू नका.
मकर : महत्त्वाच्या कामात आळस करू नका. जिद्दीने प्रयत्न करा. यश मिळेल. प्रवासात कुणावरही विश्वास ठेवू नका.
कुंभ : योजनांना गती मिळेल. प्रसिद्धी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. मित्र भेटतील.
मीन : अपेक्षित व्यक्ती भेटल्याने तुमचे काम पूर्ण करता येईल. वाहन जपून चालवा. मौज-मजा कराल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा