राशीभविष्य : आज शनिवार १४ आक्टोबर २०२३. गुरू प्रतिष्ठा वढेल, परिस्थितीचे भान ठेवा. संततीची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल,कलह निर्माण होईल
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शनिवार १४ आक्टोबर २०२३, आज भाद्रपद अमावस्या. पितृमोक्ष किंवा सर्वपित्री अमावास्या. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल. ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष –
आज षष्ठस्थानात चंद्र बुध सूर्य एकत्र आहेत. प्रकृती नाजूक होईल. कुटुंब सोबत राहील. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. तसेच राशीस्थानातील गुरू प्रतिष्ठा वाढवेल. जीवनात गोडी निर्माण करेल. दिवस मध्यम.
वृषभ –
घरात महत्त्वाचे निर्णय घ्याल. पंचम स्थानातील चंद्रसूर्य संतती भेट घडवेल. शैक्षणिक क्षेत्रात यश देईल. सामाजिकदृष्ट्या चांगला दिवस आहे. लाभ स्थानात गुरू आहे. कार्याला शुभ संकेत देत आहे. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. दिवस उत्तम.
मिथुन –
राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्राचे भ्रमण नोकरीच्या ठिकाणी उत्तम संधी देईल. पितृसुख मिळेल. तसेच आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस असून आज गुंतवणूक करा. दिवस उत्तम.
कर्क –
चंद्र भ्रमण तृतीयस्थानातून होत आहे. चंद्र रवियोग नैराश्य करेल. घरामध्ये पाहुणे येतील. आर्थिकदृष्टया बरा दिवस. जास्त काळ कार्यात घालवाल. प्रकृतीला जपा. रवि गुरू सामाजिक लाभ देईल. दिवस उत्तम.
सिंह –
आज राशी स्वामी रवि द्वितीय स्थानात आहे. अधिकारी व्यक्तींशी संबंध येईल. चंद्र धन स्थानात सामाजिक क्षेत्रात आणि आर्थिकदृष्ट्या विशेष घटना घडवेल. लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस मध्यम.
कन्या –
द्वितीय स्थानातील मंगळ व राशीतील चंद्र व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या अचानक फळ देईल. खर्च वाढ करेल. वैवाहिक जीवन बरे राहील. जोडीने घरासाठी खरेदी कराल. अष्टमातील ग्रह प्रकृती जपा, असे सांगत आहे. दिवस बरा.
तूळ –
राशीस्थानात मंगळ आर्थिक, नोकरीसंबंधी अडचणी आणेल. कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. व्यय चंद्र, राशीतील केतू थोडा मानसिक ताण निर्माण करेल. शनी संततीकडे लक्ष द्या, असे सांगत आहे. दिवस उत्तम.
वृश्चिक –
चंद्र व्यावसायिक, मानसिक, आर्थिक लाभ करील. रवि संतती आणि शिक्षण यासाठी उत्तम आहे. प्रवास जपून करा. परिस्थितीचे भान ठेवा. घरामध्ये जास्ती काम पडेल. नोकरीमध्ये संधी, वैवाहिकदृष्ट्या दिवस मध्यम.
धनू –
आर्थिक बाजू समाधानी असली तरी मन व्यग्र राहील. शुक्र मंगळ भ्रमण खर्चिक अनुभव देईल. जोडीदार आणि मित्र मंडळी सोबत कलह होईल. संततीची काळजी घ्या. दिवस मध्यम.
मकर –
रवि धर्म आणि संस्कृतीबद्दल आस्था देईल. जोडीदाराला यश देईल. पोटाची काळजी घ्या. मातृ-पितृ चिंता निर्माण होईल. तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आज चंद्र जीवनाची दिशा निश्चित करेल. प्रवास संभवतात. दिवस कामकाज करण्यात घालवाल.
कुंभ –
अष्टम स्थानातील चंद्र कुटुंबविषयी समाचार देईल. आर्थिक लाभ होईल. सरकार दरबारी असलेली कामे होतील. राशी स्थानातील शनी मानसिक विरक्त वृत्तीचा अनुभव देईल. ईश कृपेने दिवस बरा जाईल.
मीन –
मंगळ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या, असे सांगत आहे. सरकारी कामे, वरिष्ठ भेट होईल. अष्टम केतू कमरेचे त्रास निर्माण करील. चंद्र सामाजिक, कौटुंबिक जीवनात लाभ देईल. गृहसौख्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ.शुभम भवतू !!