राशीभविष्य : आज शनिवार २८ आक्टोबर २०२३. धंद्यात वाढ होईल. वाहन जपून चालवा. प्रतिष्ठा मिळेल. व्यवहारात सावध रहा
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शनिवार २८ आक्टोबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष :-
राजकीय क्षेत्रात विरोधात गेलेले लोक मैत्री करण्यास येतील. प्रेमाला चालना मिळेल. घरातील समस्या सोडवाल.
वृषभ :-
संसारात क्षुल्लक तणाव होईल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. वसुली करण्यात संयम ठेवा.
मिथुन ः-
धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन ओळखी होतील. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. नोकरी मिळेल.
कर्क :-
नोकरीच्या ठिकाणी तणाव होईल. काम करण्यात चूक होऊ शकते. सौम्य शब्दात बोला. धंद्यात गोड बोला.
सिंह : –
मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. स्पर्धा जिंकाल. धंद्यात मोठे काम मिळेल. ओळखी वाढतील.
कन्या ः
शेजारी मदत करतील. वरिष्ठांचा तुमच्यावर दबाव राहील. वाहन जपून चालवा. घरातील लोकांना समजून घ्या.
तूळ ः
अडचणीत आलेले काम पूर्ण करा. वाहन, घर खरेदीचा विचार कराल. नवीन ओळखी होतील. प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक ः
घरगुती कामे करून घ्या. वेळेला महत्व द्या. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यातील चर्चा करताना रागावर ताबा ठेवा.
धनु ः-
तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. स्पर्धा जिंकाल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल.
मकर ः-
योग्य निर्णय घेता येईल. कठीण काम करून घेता येईल. धंद्यातील समस्या सोडवा. केस जिंकता येईल.
कुंभ ः-
तुमचा प्रभाव तुमच्या क्षेत्रात वाढेल. आप्तेष्ठ भेटतील. धंद्यात मोठे काम मिळेल. वसुली करा. स्पर्धा जिंकाल.
मीन ः-
मनावर दडपण येईल. वरिष्ठांच्या मनाविरुद्ध बोलू नका. चर्चा करताना तारतम्य ठेवा. व्यवहारात सावध रहा.