राशिभविष्य ; आज दुसरा श्रावणी सोमवार २८ ऑगस्ट २०२३, कसा असेल आपला आजचा दिवस
भगवान शंकराला ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; काय आहे महत्त्व?
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज दुसरा श्रावणी सोमवार २८ ऑगस्ट २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ वाहावी, ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा.
महिन्यातला दुसरा सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. या संदर्भात माहिती जाणून घेऊयात.
श्रावणी सोमवार व्रत :
श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.
अशी करा पूजा :
सोमवार व्रत पद्धत 2 : आणखी एका वेगळ्या प्रकारे सोमवार व्रत केले जाते. हे व्रत श्रावणाप्रमाणेच चैत्र, वैशाख, कार्तिक आणि मार्गशीर्ष ह्या महिन्यांमध्येही केले जाते. मात्र श्रावणातील सोमवारी केल्यास ते विशेष मानले जाते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. तत्पश्र्चात’ओम नम: शिवाय’ ह्या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ‘ओम नम: शिवाय:’ या मंत्रोच्चारासह पार्वतीमातेची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. ह्या दिवशी एकभुक्त राहावे. अशातऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे. श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुमच्या कौटुंबिक जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. कुठेतरी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी अविवाहित लोकांना विवाहासाठी चांगले संबंध मिळतील. भावंड आणि मित्रांसोबत तुमचे संबंध दृढ होणार आहेत.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये बॉसकडून शाबासकी मिळू शकते. कम्युनिकेशनशी संबंधित लोकांच्या कामात प्रगतीची चिन्हे आहेत.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी सर्वार्थाने अनुकूलता लाभेल. नोकरीच्या ठिकाणी लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी नोकरी करत असाल तर तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराबाबत थोडे सावध राहावे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींचा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत तुमचा कोणताही वाद होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या भेटीने तुमची काही रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुमची तब्येत थोडीशी बिघडलेली असण्याची शक्यता आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर काळजी घ्या.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी भागीदारीत कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो तुमच्यासाठी शुभ राहील. काही काम पूर्ण झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणतेही काम घाईगडबडीत करु नका. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी अविवाहित लोकांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी दुसऱ्याला पैसे उधार देऊ नका. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाआजच्या दिवशी दुसऱ्याला पैसे उधार देऊ नका. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा कठीण जाईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा