भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज रविवार १२ नोव्हेंबर २०२३. आज आश्विन कृष्ण अमावस्या, लक्ष्मीपूजन. जबाबदाऱ्या पूर्ण कराल,कलह टाळण्याचा प्रयत्न करा

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज रविवार १२ नोव्हेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष –
आज सप्तम स्थानातील चंद्र अनेक घटना घडवेल. आर्थिक लाभ झाल्याने घरात सुखद लहरी राहतील. जास्तीचे काम काढून घराची देखरेख करण्याकडे कल राहील. पूजा, धार्मिक कार्य घडेल. प्रवास टाळा. दिवस शुभ.

वृषभ –
चंद्र आणि गुरू परदेशसंबंधी घडामोडी करीत आहे. धार्मिक बाबींमध्ये, घरात खर्चिक अनुभव येतील. वक्री शनि नोकरीत जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. शुभ फळ देणारा असा हा दिवस आहे.

मिथुन –
आज चंद्र पंचमस्थानात आहे. आर्थिक आणि व्यावसायिक जीवन कष्टाचे राहील आणि कौटुंबिकदृष्ट्या शुभ फळ देईल. जबाबदाऱ्या पूर्ण कराल. रवि बुध प्राप्तीचे संकेत देत आहेत. वाहन लाभ होऊ शकतो. काळजी घ्या. दिवस बरा.

कर्क –
गुरू दशम स्थानात असून नोकरीत बदल देईल. कामात जबाबदारी येईल. सांसारिक जीवनात गोडी राहील. शनि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मन व्यग्र ठेवेल. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. दिवस जपून राहण्याचा आहे. चंद्र व्यावसायिक जबाबदारी देईल. मध्यम दिवस.

सिंह –
आज रवि तृतीय स्थानात असेल. अचानक प्रवास योग. मित्र भेट होईल. स्वतः मध्ये सुधारणा करा. तृतीय चंद्र आहे, प्रवासात लाभ देईल. कलह टाळायचा प्रयत्न करा. घरामध्ये वेळ द्या. दिवस चांगला जाईल.

कन्या –
अष्टम स्थानातून गुरू भ्रमण कष्ट देणारे असून घरामध्ये घडामोडी दर्शवित आहे. लाभ चंद्र आहे. मित्र-मैत्रिणींसोबत दिवस व्यतीत करा. आनंदात रहा. घरात जास्तीचे खर्च होतील. आर्थिक लाभ देखील होतील. दिवस बरा.

तूळ –
आज दिवस पाहुणे मंडळींची भेट, समारंभ प्रवास अशा बाबींमध्ये यश देईल. नवीन व्यक्तीची ओळख होईल. प्रवास योग येतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कार्यालयात जास्तीचे काम पडेल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम.

वृश्चिक –
व्यय स्थानातील चंद्र व्यावसायिकदृष्ट्या कठीण असून प्रवाससंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. भावंडाना, व्यवसाय नोकरीत शुक्र लाभ देईल. घरात जास्त काम निघेल. दिवस चांगला.

धनु –
आज दिवस घरगुती कामात जाईल. मन रमेल. संततीचे आरोग्य सांभाळा. नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा. कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. जोडीदाराची चिंता वाटेल. आर्थिकदृष्ट्या दिवस बरा आहे.

मकर –
कौटुंबिक जीवन आणि संतती यांची काळजी घेण्याचा आज दिवस आहे. नोकरीसाठी प्रवास करताना जपून राहा. आरोग्य चिंता कमी होईल. आर्थिकदृष्ट्या एकूण दिवस बरा आहे.

कुंभ –
राशी स्थानातील शनी भ्रमण हे धोक्यापासून सावध राहा, असे आवाहन करीत आहे. प्रकृती उत्तम राहील. संततीशी कलह टाळा. वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील. घरात कार्याचे योग येतील. गुरू साथ देईल. दिवस बरा.

मीन –
आज अष्टम चंद्र घरामध्ये ताण निर्माण करेल. जबाबदारी मध्ये सहभागी व्हा असे संकेत देत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मध्यम दिवस. भावंड भेट होईल. शैक्षणिक लाभ होतील. प्रवासाचे योग. दिवस उत्तम. शुभम भवतू..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!