भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज रविवार २६ नोव्हेंबर २०२३. आळस सोडून द्या, कामात व्यग्र राहा.आर्थिक स्थिती मजबूत राहील. सावध राहा. नशिबाची साथ मिळेल,अधिकार आणि संपत्ती वाढेल.काळजी घ्या

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज रविवार २६ नोव्हेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries) :
पूर्वनियोजित प्रवास पुढे ढकलावा लागू शकेल. आज तुम्हाला तुमचे खर्च संतुलित करावे लागतील. कारण तुमचे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असू शकतात. तणाव आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. घरगुती वापरासाठी काही आवडत्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. आज तुमचा सरकारकडून सन्मान होऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून, बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घ्यायचं असेल, तर ते आज घेण्याचं टाळा. कारण आज घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं कठीण होईल. तुम्हाला जुन्या मित्रांचं सहकार्य मिळेल. चांगल्या मित्रांची संख्या वाढेल.

वृषभ (Taurus) :
आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कष्टांच्या प्रमाणात तुम्हाला दुप्पट नफा मिळेल. तुमचं वर्तन सहकार्याचं ठेवा, कारण यामुळे तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळण्यास मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी किंवा व्यावसायिक क्षेत्रात एखाद्या व्यावसायिकाशी वाद होऊ शकतो. सावध राहा. आजचा दिवस खूप व्यग्रतेचा असेल. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला एखाद्या कामाची देवाणघेवाण करायची असेल, तर ती मनापासून करा. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल.

मिथुन (Gemini) :
आज तुम्ही कामात व्यग्र असाल. धार्मिक कार्यात तुमची आवड आणि नवीन टेक्नॉलॉजीचं ज्ञान वाढवण्याकडे तुमचा कल असेल. एकंदरीत आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. उत्पन्न-खर्चाची स्थितीही संतुलित राहील. नोकरदारांची प्रगती होईल. आज अनावश्यक खर्च टाळा. सामाजिक काम करताना व्यत्यय येऊ शकतो, काळजी घ्या. काही अनपेक्षित लाभांमुळे तुमची धर्म आणि अध्यात्मातली रुची वाढेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

कर्क (Cancer) :
आज नशीब पूर्ण साथ देईल. तुम्ही काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक एखादं काम करा, तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमची अपूर्ण कामं आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा व्यवसायातल्या भागीदाराकडून सहकार्य मिळेल. आजचा दिवस नशिबाच्या दृष्टीने चांगला आहे. तुम्हाला कष्टाचं चांगलं फळ मिळू शकते. मुलांवरचा विश्वास अधिक दृढ होईल. तुम्ही आरामदायी वस्तूंवर पैसे खर्च कराल. त्यामुळे तुमचे शत्रू नाराज होऊ शकतात.

सिंह (Leo) :
आज जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, सावध राहा. भावनांवर नियंत्रण ठेवून कोणताही निर्णय घ्या. कारण भावनिकतेला प्राधान्य देऊन घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होईल. भागीदारीत केलेला व्यवसाय लाभदायक ठरेल. आजचा दिवस लाभदायक राहील. दिवसाच्या उत्तरार्धात आई-वडिलांचं पाठबळ आणि आशीर्वाद मिळतील. आरामासाठी वेळ मिळेल. आज तुमच्या सासरच्या व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना गोड शब्द वापरा. अन्यथा नात्यात कटुता येईल.

कन्या (Virgo) :
आज तुमचे विरोधक पराभूत होतील. प्रियजनांना भेटणं किंवा एखाद्या ठिकाणी त्यांची उपस्थिती तुम्हाला आनंदी ठेवेल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. तुम्हाला कोणाकडून पैसे घ्यायचे असतील, तर आजच प्रयत्न करा. त्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात यश मिळेल. आज तुमच्या मनात निर्भयतेची भावना असेल. तुम्ही तुमची कठीण कामं धैर्याने पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून पाठिंबा आणि आनंद मिळेल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होईल.

तूळ (Libra) :
तुमच्या कार्यक्षमतेचं आज कौतुक होईल. तुमचे सहकारी तुमच्याकडून शिकतील. नातेवाईकांच्या वारंवार भेटीगाठी होतील. महत्त्वाकांक्षी स्वभाव असणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुम्हाला जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्याकडे असणारे अधिकार आणि संपत्ती वाढेल. तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार कराल. मनापासून सेवा कराल. आज गुरूंप्रती संपूर्ण भक्ती आणि निष्ठा ठेवा. आज नवीन गोष्टीसाठी वेळ दिल्यास दिवस शुभ राहील.

वृश्चिक (Scorpio) :
काही दिवसांपासून तुम्हाला वाटत असणारी अस्वस्थता आज कमी होईल. आज अंतर्मनाची शांतता अनुभवाल. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. आज तुमचा अर्धा दिवस परोपकारात जाईल. इतरांना मदत केल्याने समाधान मिळेल. आज तुमचं मन थोडं अस्वस्थ राहील, काळजी घ्या. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरतील. संध्याकाळपर्यंत तुम्ही संयम आणि बुद्धिमत्तेच्या साह्याने शत्रुपक्षावर विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकता.

धनू (Sagittarius) :
कोणतंही काम सावधगिरीने केल्यास आनंद कायम राहील. कोणाशीही वाद घालू नका. आज तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. तुमचे खर्च कमी झाल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आज वाहनसौख्य लाभेल. तुमचं ज्ञान वाढेल. तुमच्यात परोपकाराची भावना दिसून येईल. तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. स्वतःच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. सावध राहा.

मकर (Capricorn) :
नवीन कामासाठी आज प्रवास होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. शौर्य आणि आत्मविश्वास वाढेल. पत्नी किंवा मुलाची अचानक प्रकृती बिघडल्याने घरात तणावाचं वातावरण असेल. सासरच्यांकडून मानसन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात रस राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला नवीन कामात गुंतवणूक करायची असेल, तर ती निश्चितपणे करा. भविष्यात फायदा होईल.

कुंभ (Aquarius) :
आज ग्रहांच्या हालचालींमुळे तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. तुमच्या हातात मोठी रक्कम मिळाल्याने तुम्ही समाधानी असाल. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही चिंतामुक्त आणि सक्रिय असाल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल. आजचा दिवस शहाणपणा आणि विवेकाचा वापर करून नवीन शोध घेण्यासाठी व्यतीत करा. कुटुंबातल्या सदस्यांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो, सावध राहा. ऐहिक सुखाचा पूर्ण उपभोग घेऊ देणारा आजचा दिवस असेल.

मीन (Pisces) :
दीर्घ काळ चाललेल्या गोंधळातून आज सुटका होईल. आळस सोडून द्या आणि कामात व्यग्र राहा. अनावश्यक खर्च टाळा. नोकरी आणि व्यवसायात परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीमुळे भरपूर लाभ मिळेल. मुलांशी संबंधित दीर्घ काळापासून सुरू असणारा वाद सुटू शकतो. तुमच्या आनंदी व्यक्तिमत्त्वामुळे इतर व्यक्ती तुमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक आदर मिळाल्याने तुमचं मनोबल वाढेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!