राशीभविष्य : आज गुरुवार २ नोव्हेंबर २०२३. घरात विशेष घटना घडतील, कार्य करताना विचार करा, व्यवसायात लाभ होईल, प्रकृती जपा, गैरसमज टाळा
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज गुरुवार २ नोव्हेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष – आज दिवस आनंदात घालवा. राशीतील गुरू आणि तृतीय चंद्र आनंदी व्यक्तिमत्त्व देईल. व्यय राहू घरामध्ये जास्त खर्च होईल. रवि येत्या काही दिवसात नोकरीसाठी शुभ समाचार देईल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.
वृषभ –
व्यय गुरू असून काही खर्चाचे प्रसंग येतील. प्रकृती जपून रहा. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदारासोबत वेळ घालवा. दिवस मध्यम.
मिथुन –
राशीस्थानात चंद्र आहे. काही कारणाने नोकरीमध्ये ताणाचे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कार्य करताना विचार करा. संतती व्यग्र राहील. प्रवास, भावंडं भेट घडेल. व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.
कर्क –
भाग्य राहू स्थान बदल करेल. व्यय चंद्र संततीला आणि वैवाहिक जीवनात जपून राहण्याचे संकेत आहे. व्यवसायात लाभ होईल. प्रतिष्ठा मिळेल. घरामध्ये प्रकृती जपून काम करा. दिवस शुभ.
सिंह –
आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिकदृष्ट्या दिवस मध्यम.
कन्या –
समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. दशम चंद्र शुभकार्य घडवून आणेल. आर्थिक व्यय होतील. बंधुभेटीचे योग येतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.
तूळ –
भाग्य चंद्र घरामध्ये सुंदर वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील. लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. दिवस उत्तम.
वृश्चिक –
बुध वृश्चिक व्यक्तींना चांगली संधी आणेल, फायदा घ्या. प्रयत्नपूर्वक शांत रहा. नैराश्याचा काळ येऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. चंद्र गृह सौख्य, नोकरी यासाठी मध्यम फळ देईल.
धनू –
राहू चतुर्थ स्थानात घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणील. सप्तम चंद्र योग जीवनात घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. लेखनामध्ये यश मिळेल. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम दिवस.
मकर –
षष्ठस्थानात चंद्र नोकरीसंबंधी संधी मिळेल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा. घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम.
कुंभ –
राशीतील शनी आणि तृतीय चंद्र असून वरिष्ठ अधिकारी भेट होईल, असे संकेत देत आहे. मंगळ नाते संबंध ताणलेले असून सामाजिक जीवनात कष्ट देईल. प्रवास योग येतील. दिवस बरा.
मीन –
राशी स्वामी शुभ आहे. आर्थिक लाभ देईल. राशीत आलेल्या राहुमुळे सामाजिक, आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी होईल असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. प्रवास, बंधुभेट संभवते. चतुर्थ स्थानात चंद्र आहे. दिवस चांगला.शुभम भवतू!!