भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज गुरुवार ९ नोव्हेंबर २०२३. संघर्ष टाळण्यासाठी मुत्सद्देगिरीने वागा.सावधगिरी बाळगा.संघर्षाचं निराकरण करा

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज गुरुवार ९ नोव्हेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries)
घरी शिस्तबद्ध राहणीमान ठेवण्याची गरज आहे. संतुलित वातावरण राहील यावर भर द्या. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील, त्यासाठी तुम्ही प्रेमाचा स्वीकार करा आणि रोमँटिक क्षण अनुभवा. नातेवाईकांसोबत काही आनंदी स्नेहमेळावे घडू शकतात. व्यावसायिक स्थैर्य आणि यश मिळेल. मात्र त्यासाठी निष्ठा आणि लक्ष केंद्रीत करावं लागेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी स्वतःवर घातलेल्या मर्यादांना आव्हान द्या. व्यवसायात नवीन आणि उत्कंठावर्धक संधी मिळण्याची शक्यता आहे. काही आर्थिक लाभ मिळतील, पण गुंतवणुकीमध्ये सावधगिरी बाळगा. संघर्ष टाळण्यासाठी मुत्सद्देगिरीने वागा. भावनिक आणि शारीरिक लवचिकता असू द्या. घरगुती वादामध्ये वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या.

वृषभ (Taurus)
घरी सुसंवादी आणि परिपूर्ण वातावरण राहील. त्यामुळे सखोल भावनिक बंध जुळतील. नातेवाईकांकडून आधार आणि उदारतेचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख प्रस्थापित होण्याची संधी तुमची वाट पाहत आहे. बोलण्यात स्पष्टता आणि विचारांमध्ये नावीन्य ठेवा. आर्थिक स्थिरतेसाठी काहीसा संघर्ष करावा लागू शकतो, पण भविष्यात चांगले आर्थिक लाभ मिळतील. गुंतवणुकीबाबत जवळच्या मित्राचा सल्ला उपयोगी पडेल. कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण राहील. चांगलं आरोग्य आणि चैतन्य जीवनात आनंद आणेल. कौटुंबिक सोहळे आणि आनंदी क्षण अनुभवाल.

मिथुन (Gemini)
नवीन नाती जोडताना कुटुंबातल्या भावनिक आव्हानांनाही सामोरं जा. विशेषतः नातेवाईकांशी सौहार्द राखा आणि गैरसमज टाळा. बौद्धिक कुतूहल दाखवा आणि व्यावसायिक वाढीसाठी परिश्रमपूर्वक काम करा. बर्नआउट टाळण्यासाठी कामं इतरांवर सोपवा आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीच्या निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि कार्यालयीन राजकारण टाळण्यासाठी तटस्थ रहा. स्वतःची काळजी आणि उपचारांना प्राधान्य द्या. काही बाबतीत क्षमा करणं महत्त्वाचं असू शकतं.

कर्क (Cancer)
घरामध्ये समाधान शोधण्यासाठी आणि स्थिर, वचनबद्ध नातेसंबंध राखण्यासाठी आत्मनिरीक्षण करा. नातेवाईकांबाबत नातेसंबंधांच्या सीमा निश्चित करण्याचा विचार करा. वाढलेली भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता तुमच्या करिअरवर सकारात्मक परिणाम करू शकते, ज्यामुळे कामाचं वातावरण अधिक समाधानकारक बनेल. प्रगतीच्या नवीन संधींचा शोध घेतल्यास नोकरीतली कंटाळ्याची भावना दूर होऊ शकते. या आठवड्यात अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. गुंतवणुकीमध्ये जोखीम आणि मोबदला यांचा मेळ घाला. मुत्सद्देगिरी आणि विविध दृष्टिकोनांचा विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला सामर्थ्य आणि चैतन्य मिळेल. संघर्षाचं निराकरण करा.

सिंह (Leo)
घरगुती गोष्टींमध्ये संयम आणि चिकाटी ठेवा. तसंच प्रेम, सृजनाची भावना आणि नातेसंबंध जोपासा. एखाद्या मित्राचं संरक्षण करण्यासाठी तयार व्हा, तुमच्यातले नेतृत्वगुण दाखवा. परीश्रम आणि तपशीलात जाण्यावर भर द्या. व्यावसायिक गोष्टींमध्ये धोरणात्मक नियोजनाची गरज आहे. यामुळे झटपट आर्थिक लाभ मिळेल व गुंतवणुकीतूनही संभाव्य परतावा मिळेल. तुमचा करिष्मा आणि प्रभाव याचा सकारात्मक वापर करा. चांगल्या आरोग्यासाठी औषधांवरचं अवलंबित्व कमी करा. समेट घडवण्यासाठी क्षमा आणि राग आल्यास सोडून देणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत.

कन्या (Virgo)
उत्कट नातेसंबंधांमध्ये गुंतवणूक केली, तर तुमच्या घरगुती जीवनातली व्यावहारिकता आणि स्थिरता राखली जाईल. तुमच्या कारकिर्दीत कौशल्य विकासासाठी समर्पण करण्यासोबतच आव्हानात्मक व्यक्तींपासून भावनिक अलिप्तपणा राखा. व्यवसायातल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी चिकाटीसह सहकाऱ्यांशी नातेसंबंध जोपासण्यास प्रोत्साहन द्या. गुंतवणुकीच्या निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि व्यवहारात निष्पक्षता राखा. आगामी आठवड्यात आर्थिक वाढ होऊ शकते. आत्मचिंतन, स्वतःची काळजी आणि कौटुंबिक आणि परंपरेबाबतची तीव्र भाव दाटून येईल.

तूळ (Libra)
घरगुती बाबींमध्ये संतुलन साधा आणि निर्णय घ्या. नवीन प्रेम आणि भावनिक पूर्तता साध्य होईल. कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत सूक्ष्म सीमा राखणं आवश्यक आहे. तुमच्या करिअरमध्ये ऊर्जा आणि उत्साह येईल. कामाचं सुसंवादी आणि आश्वासक वातावरण निर्माण करा. व्यवसायातील यशासाठी सहयोग आणि भागीदारी संभवते. काही तडजोडी करून, मतभेद दूर करतानाच अनुकूल आर्थिक पुनर्प्राप्ती, स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक अनुभवाल. आयुष्यातल्या सगळ्या पैलूंमध्ये संतुलन आणि निष्पक्षता राखा. कुटुंबासोबत खुला आणि प्रामाणिक संवाद ठेवा.

वृश्चिक (Scorpio)
ज्या नात्यांमध्ये तुम्ही भावनिकदृष्ट्या गुंतला आहात, तिथे भावनिक जखमांवर फुंकर घाला आणि क्षमा करण्याचे मार्ग शोधा. जवळच्या मित्राला पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे. करिअरमध्ये धोरणात्मक नियोजन आणि गुप्तता बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख प्रस्थापित होईल. तसंच लवकरच मोठी जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. तसंच नव्या आणि नावीन्यपूर्ण व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. आर्थिक घडामोडी वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयांना अनुकूल ठरतील. गुंतवणुकीबाबत काळजीपूर्वक विश्लेषण करून निर्णय घ्या. तुमच्या अंतर्ज्ञान आणि प्रभावाचा सकारात्मक वापर करा. आरोग्याबाबत बदल घडलील व चांगली प्रगती होईल. स्वतःची काळजी आणि भावनिक जखमांवर फुंकर घाला.

धनू (Sagittarius) भूतकाळातली नाराजी सोडून द्या आणि घरात नवीन सुरुवात करा. नवीन संधी मिळेल आणि भावनिक प्रगती होईल. नातेवाईकांचं समर्थन आणि सल्ला घ्या. तुमच्या करिअरमध्ये सर्जनशीलता आणि आवड यांना महत्त्वं द्या. सध्याच्या व्यावसायिक कल्पनांचं पुनर्मूल्यांकन आणि नवीन शक्यतांचा शोध घेण्यासोबतच आव्हानात्मक कामाच्या परिस्थितीत चिकाटी महत्त्वाची आहे. गुंतवणुकीच्या निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला घेत, संथ पण स्थिर आर्थिक प्रगतीचा अंदाज घ्या. निष्पक्षतेचं समर्थन करणं आणि आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे. जीवनातल्या सगळ्या पैलूंमध्ये संतुलन आणि संयम राहील. कुटुंबात काही सकारात्मक बदल घडतील आणि संधी मिळतील.

मकर (Capricorn)
तुमच्या घरातलं वातावरण सुधारण्यासाठी, भावनिक पूर्तता आणि नातेसंबंधांमध्ये आनंद आणण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करा. एकांतात न राहता आपल्या प्रियजनांसोबत यश साजरं करा आणि करिअरमधल्या आव्हानांसाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधा. नवीन दृष्टिकोन आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी व्यावसायिक उपक्रमांमध्ये यश आणि आर्थिक स्थिरता दर्शवतात. दीर्घकालीन फायद्यांसह आर्थिक लाभ मिळू शकतो. स्थिर उपक्रमांमध्ये गुंतवणूक करा. कार्यालयीन राजकारणात संयम आणि चातुर्य वापरा. एकंदर स्वास्थ्य, स्वतःचं हेल्थ सायकल पूर्ण करणं आणि कुटुंबातली एकता आणि सामर्थ्य राखणं याला महत्त्व द्या.

कुंभ (Aquarius)
तुमच्या भावनिक अपेक्षांचं व्यवस्थापन करा आणि घरगुती बाबींमध्ये प्रगती कराल. भूतकाळातल्या जखमा सोडून द्या आणि नवीन प्रेमाच्या संधींचं स्वागत करा. नातेवाईकांशी वागताना स्पष्टता आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे. बुद्धिमत्ता आणि तार्किक विचार आपल्या करिअरसाठी गरजेचे आहेत. कामाच्या ठिकाणी समतोल आणि न्याय्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. जुन्या कल्पना आठवा व त्यातून प्रेरणा घ्या. तात्पुरती आर्थिक स्थिरता मिळेल. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी पालकांचा सल्ला घ्या. नावीन्यपूर्ण कल्पना आणि प्रगतीशील बदलांचं समर्थन करा. आरोग्याबाबत आशा ठेवली, तर बरं होण्यासाठी ते सकारात्मक ठरेल. कुटुंबात क्षमा करण्याला प्राधान्य द्या.

मीन (Pisces)
तुमच्या कौटुंबिक जीवनात उत्साह आणि साहस राहील. आनंदी आणि सुसंवादी नातेसंबंध राहतील. नातेवाईकांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य घ्या. कामाच्या ठिकाणी तुमची सर्जनशील ऊर्जा ठेवा. खऱ्या यशासाठी सहकार्य आणि टीमवर्कवर भर द्या. नवीन आणि नावीन्यपूर्ण व्यवसायाच्या संधी दृष्टिपथात आहेत. नवीन कल्पनांसह आर्थिक प्रगती साधली जाईल. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमचा अंतर्ज्ञानी स्वभाव स्वीकारा आणि कार्यालयीन राजकारणात मुत्सद्देगिरीनं गोष्टी हाताळा. भावनिक स्वास्थ्य, एकमेकांच्या मर्य़ादांचा आदर करणं आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!