राशीभविष्य : आज गुरुवार १४ सप्टेंबर २०२३. आज पोळा, पिठोरी अमावस्या,श्रावण अमावस्या, कसा असेल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज गुरुवार १४ सप्टेंबर २०२३, आज पोळा, श्रावण अमावस्या. पिठोरी अमावस्या. आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष
चंद्र भ्रमण नोकरीत , व्यवहारात जपून रहा असे सांगत आहे. षष्ठ मंगळ प्रकृतीसाठी कष्ट देईल. पराक्रम आणि शैक्षणिक दृष्ट्या फळ देईल. मानसिक ताण कमी होईल. . सामाजिक जाणीव निर्माण होईल. अमावस्या संतती चिंता लावेल.
वृषभ
चतुर्थस्थानात चंद्राचे भ्रमण मध्यम ठरेल . तृतीय स्थानातील शुक्र उत्तम असून खरेदी योग येतील . घरात काही विशेष काम निघेल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. पंचम मंगळ संतती सुख देईल. प्रकृती जपा. अमावस्या गृहचिंता देईल.
मिथुन
चंद्राचे तृतीयस्थानातून भ्रमण असून नातेवाईकांशी भेट होईल.. शुक्र आकर्षक व्यक्तिमत्व देईल. आर्थिक लाभ घडवेल. प्रवास योग ,भेटीगाठी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस घडामोडींचा राहील. प्रवास टाळा.
कर्क
कर्मस्थानात गुरू राहू सोबत असून अनेक घटना दाखवित आहे आर्थिक पाठबळ राहील.. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवनात उतारचढाव होतील. अमावस्येच्या दिवशी खर्च व गैरसमज टाळा. संतती ठीक राहील. दिवस मध्यम.
सिंह
आज धर्म आणि सामाजिक जीवनात कुरबुरी देणारे ग्रहमान आहे. गुरू बल असल्यामुळे दिवस नीट पार पडेल. मंगळ वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू करेल. प्रवासात जपा. स्वराशितील अमावस्या मानसिक ताण देईल. मध्यम दिवस.
कन्या
काहीसा त्रास झाला तरी नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत उत्तम संधी मिळतील. आर्थिक नुकसान होईल. सुख सोयी साठी खर्च कराल. दिवस मध्यम असून संतती तणाव देइल.
तुला
एक लाभदायक दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल .वरिष्ठ कामाची दाखल घेतील. कौटुंबिक जीवनासाठी शुभ योग असून आनंदाचे वातावरण राहील. मित्र भेट होईल. प्रवास घडेल. अमावस्या लाभ देईल.
वृश्चिक
परदेश संबंधी कामात यश मिळेल.आर्थिक लाभ, कार्यक्षेत्रात कष्ट देणारा दिवस आहे. घरात देखील जास्तीचे काम येईल. सत्संग घडेल. घरासाठी मध्यम दिवस. मंगळ दशमात आहे. दिवसाचा आनंद घ्या पण जपुन.
धनू
गृह सौख्य ,वाहन आणि वास्तू लाभ आणि धार्मिक आस्था निर्माण करणारा दिवस आहे. भाग्यस्थानातील चंद्र भ्रमण जीवनात वेगळे अनुभव देईल. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक जीवन त्रासदायक राहील.. दिवस मध्यम.
मकर
चंद्र आज व्यावसायिक जीवनात फळ प्रदान करीत आहे.सांभाळून राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास होतील. आर्थिक, आणि प्रकृतीच्या बाबत जपुन रहा. अमावस्या सर्व क्षेत्रात काळजी घेण्याची आहे. मध्यम दिवस.
कुंभ
आज कुटुंबाला वेळ देऊन आपल्या दिवसाची सुरवात करा. प्रवासा साठी खर्च होईल ,पण नवीन खरेदी मौजमजा करण्यात दिवस जाईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस. दिवस बरा आहे.
मीन
आज पिठोरी अमावस्या आहे . षष्ठ चंद्र मानसिक ताण आणि आर्थिक हालचाली दाखवीत आहे. शत्रू पासून सावध राहा. वैवाहिक सुख बेताचे मिळेल. अमावस्या मध्यम.
शुभम भवतू!! शुभम भवतू!!
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा