भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज गुरुवार ७ सप्टेंबर २०२३. आज दहीहंडी उत्सव, श्रावण कृष्ण नवमी, कसा असेल आपला आजचा दिवस

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज गुरुवार ७ सप्टेंबर २०२३, श्रावण कृष्ण नवमी, दहीहंडी उत्सव. बृहस्पति पूजन. चंद्राचे आज वृषभ राशीत भ्रमण. ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष –

आज दिवस आनंदात घालवा. राशीतील गुरू प्रसिद्धी आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व देईल. घरामध्ये सत्संग घडेल. पंचम स्थानात रवि येत्या काही दिवसात संततीसाठी शुभ समाचार देईल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.

वृषभ –


व्यय राहू गुरू असून काही तणावाचे प्रसंग देखील येतील, खुश रहा. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. जोडीदारासोबत वेळ घालवा. दिवस सुखद.

मिथुन –


व्यय स्थानात चंद्र आहे. काही कारणाने भावंडांमध्ये ताणाचे वातावरण राहील. चूक होऊ शकते. कार्य करताना विचार करा. संतती व्यग्र राहील. व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.

कर्क –


दशम गुरू आणि चंद्र लाभस्थानात नोकरीत बदल करेल. वैवाहिक जीवनात जपून राहण्याचे संकेत आहेत. व्यवसायात लाभ होईल. संतती सौख्य मिळेल. घरामध्ये प्रकृती जपून काम करा. दिवस बरा.

सिंह –

आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी आणि राशीतील रवि वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिकदृष्ट्या दिवस साधारण.

कन्या –

समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र भावंड भेट घडवून आणेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.

तूळ –

शुक्र घरामध्ये आवश्यक वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. संततीच्या आयुष्यात अनेक बदल होतील. कामात लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.

वृश्चिक –

मंगळ कन्या राशीत वृश्चिक व्यक्तींना चांगली संधी आणेल. फायदा घ्या. प्रयत्न पूर्वक शांत रहा. नैराश्याचा झटका येऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. चंद्र गृह सौख्य, नोकरी यासाठी मध्यम फळ देईल .

धनू –

राहू घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणील.. षष्ठ चंद्र योग प्रवासात घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . लेखनामध्ये यश मिळेल.. व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.

मकर –

पंचम स्थानात चंद्र संततीला नवीन संधी मिळेल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा. घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम.

कुंभ –

राशीतील शनी आणि चतुर्थ चंद्र शुभ असून व्यवसायात जपून असा, असे संकेत देत आहे. आठवा मंगळ नातेसंबंध ताणलेले असून सामाजिक जीवनात कष्ट देईल. दिवस बरा.

मीन –

राशी स्वामी शुभ आहे. गुरू राहुमुळे सामाजिक, आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. प्रवास, बंधु भेट संभवते. तृतीय चंद्र आहे. दिवस मध्यम.शुभ भवतू!!

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!