राशीभविष्य : आज मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३. कसा असेल आपला आजचा दिवस व आजचा आपला शुभ रंग कोणता
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
देते.
मेष Aries :
आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परदेश यात्रा होण्याचा योग निर्माण होईल. मान-सन्मानात वाढ होईल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग – लाल.
वृषभ Taurus :
तुमचे काम आणि क्षमता यामुळे नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीसाठी संपत्ती निवडाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले मार्गदर्शन लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग – पिवळा.
मिथुन Gemini :
आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. एखाद्या मित्राकडून व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. आजचा शुभ रंग – जांभळा.
कर्क Cancer :
नोकरीच्या ठिकाणी एकाग्रतेने काम करण्याची गरज आहे. अचानक धनलाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. मित्रांची चांगली साथ लाभेल. नवीन गाडी खरेदीचा विचार कराल. आजचा शुभ रंग – नारंगी.
सिंह Leo :
कामाच्या ठिकाणी आणि व्यापारात तुमच्या मनासारखे वातावरण असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. भविष्याच्या संदर्भात योजना बनवाल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. आजचा शुभ रंग – निळा.
कन्या Virgo :
आत्मविश्वासात वाढ होईल. गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या समस्यांवर तोडगा काढाल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे मान-सन्मानात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आजचा शुभ रंग – राखाडी.
तूळ Libra:
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. अचानक धनलाभ होईल. नातेसंबंधांत सुधारणा होईल. नव्या कार्याची सुरुवात कराल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आजचा शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक Scorpio :
मान सन्मानात वाढ होईल. नव्या कार्याची सुरुवात कराल. पौष्टिक आहार आणि व्यायाम याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबात सकारात्मक वातावर असेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग – जांभळा.
धनु Sagittarius :
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. दुपारनंतर आनंदाची बातमी मिळेल. एखाद्याकडून उधार घेतलेल्या पैशांची परतफेड कराल. घरी पाहुण्यांचे किंवा नातेवाईकांचे आगमन होईल. आजचा शुभ रंग – नारंगी.
मकर Capricorn :
प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. नवीन जमीन किंवा घर खरेदीचा विचार कराल. गुंतणवणुकीतून चांगला परतावा मिळेल. व्यापाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – जांभळा.
कुंभ Aquarius :
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मात्र, त्यासोबतच खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – लाल.
मीन Pisces :
नाते-संबंधांत चढ-उतार पहायला मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. उत्पन्नात वाढ झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.