राशीभविष्य : आज मंगळवार १९ सप्टेंबर २०२३. आज श्री गणेश चतुर्थी, महत्वाचे निर्णय होतील, संतती कडे लक्ष्य दया, असा जाईल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज मंगळवार १९ सप्टेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष
अचानक दिनक्रमात आनंदी अनुभव येतील. जास्त काम पडले तरी उत्साह राहील . मानसिक द्वंद्व कमी होईल… घराची जबाबदारी , वैवाहिक जीवनात कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या शुभ दिवस.
वृषभ
आज दिवस शांततेने व्यतीत करण्याचा आहे. दशमात शनि वक्री ,व्यय स्थानात ग्रह आर्थिक नुकसानीचे योग आणतील. प्रकृती जपा. षष्ठस्थानातील चंद्र आरोग्य चिंता निर्माण करेल. दिवस बरा.
मिथुन
काहीसा सामाजिक ताण उद्भवणार असून ईश्वरी पाठबळ राहील . खर्च खूप होईल. श्रीगणेशाच्या पूजनात दिवस आनंदात जाईल. प्रवास टाळा. धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या उत्तम दिवस.
कर्क
कर्म स्थानात गुरू राहू योग आहे. राशी स्वामी चंद्र चतुर्थस्थानात कौटुंबिक जीवनात यश आणेल. संततिविषयी चिंता अनुभव कराल. गुरूचे पाठबळ व शुक्र नोकरीत चांगले फळ देईल. प्रकृती जपून काम करा. दिवस चांगला .
सिंह
राशीस्थानात बुध बुद्धिदायक असून अनेक लाभ देईल. प्रकृतीची काळजी घ्या. तृतीय चंद्र आहे. महत्वाचे निर्णय होतील. गुरू भाग्यात उत्तम साथ देईल. दिवस ईश पूजनात घालवा.
कन्या
सामाजिक आणि गृह क्षेत्रात काही घडामोडी होतील. प्रकृती उत्तम राहील. चंद्र आर्थिक लाभ देणार असून कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न कमी होतील. संतती आनंदात राहील. दिवस उत्तम. गणरायाचे नामस्मरण करावे.
तुला
शुक्र दशमात नोकरी मध्ये संधी देईल. अध्यात्मिक बाबीत खर्च भरपूर होईल. घरात सुखसोयी मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक
मंगळ वृश्चिक व्यक्तीना नोकरी निमित्त प्रवास, बढती देईल. वडिलांची प्रकृती जपण्याचे संकेत देत आहे . प्रयत्न पूर्वक जागरूक रहा. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. विवाहसौख्य ,आर्थिक, धर्म कारण यासाठी उत्तम फळ देईल . ईश स्मरण करावे.
धनू
गुरुकृपा आणि रवि बळ नोकरी आणि व्यवसायात अडचणीतून मार्ग काढेल .पंचम गुरू व लाभ चंद्र सामाजिक दृष्टया ठीक राहील. प्रकृती जपा. संतती सुखी होईल. दिवस चांगला .
मकर
दशम चंद्र आणि मंगळ यांचा प्रभाव आहे त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक नुकसानीचे योग बनत आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास योग येतील .जोडीदारासोबत वेळ घालवाल. दिवस ठीक.
कुंभ
शनी राशीमध्ये वक्री भ्रमण करीत आहे. कुंभ व्यक्ती आज ताण अनुभव करतील. चंद्र घरात जास्त जबाबदारी निर्माण करेल . प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. मुलांचे प्रश्न सुटतील. संतती ,व्यवसाय नोकरी साठी शुभ दिवस.
मीन
राशी स्वामी गुरु सध्या राहू सोबत असून परदेश गमन होईल. चंद्राच्या अष्टम स्थानातील उपस्थिती मुळे आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक जीवनात अनेक गोष्टींमुळे त्रास असा हा काळ आहे. कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल. दिवस मध्यम..
शुभम भवतू!!
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा