राशिभविष्य ; आज बुधवार २१ डिसेंबर २०२२, कसा असेल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष : धंद्यात गोड बोलून राहा. काम मिळेल. आज ठरविलेले काम पूर्ण करा. ओळखी होतील.
वृषभ : अडथळे येतील. मन अस्थिर होईल. अचानक तणाव होऊ शकतो. चूक करू नका.
मिथुन : तुमच्यावर जास्त कामाची जबाबदारी येऊ शकते. दुर्लक्ष करू नका. छोटीशी चूक होऊ शकते.
कर्क : वाटाघाटीत यश मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. संगीत कलेत मन विशेष रमेल. ओळख होईल.
सिंह : नातलगांच्या मदतीला जावे लागेल. खर्च होईल. महत्त्वाची वस्तू नीट जागेवर ठेवा. काम वाढेल.
कन्या : जीवनसाथीच्या मदतीने कठीण काम पूर्ण करता येईल. जुने स्नेही भेटतील. नोकरीत बदली होऊ शकते.
तूळ : तुमच्यावर अवलंबून असणार्यांची निराशा होणार नाही. वाहन जपून चालवा. चांगली बातमी मिळेल.
वृश्चिक : खंबीरपणे प्रश्न सोडवाल. तुमचे मत पटवून देता येईल. कल्पनाशक्तीद्वारे कठीण काम कराल.
धनु : धंद्यात जम बसेल. नोकरी मिळेल. कोर्टकेस जिंकाल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.
मकर : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. कामे करून घ्या.
कुंभ : प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. सरकारी कामात प्रगती संभवते. विचारपूर्वक कृती करा.
मीन : प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. ओळखीतून कामे मार्गी लागतील. प्रयत्न सोडू नका.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा