भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशिभविष्य : आज बुधवार २८ डिसेंबर, कसा असेल आपला आजचा दिवस

मुंबई,मंडे टू मंडे न्युज । आज २८ डिसेंबर २०२२, बुधवार, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल  हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष : तुमचा कामाचा उत्साह इतरांना प्रेरणा देणारा ठरेल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. नोकरीत नमते घ्या.

वृषभ : धंद्यात काम मिळेल. घरातील व्यक्तीसाठी खर्च करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. पोटाची काळजी घ्या.

मिथुन : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. वेगाने प्रगती करता येईल. स्पर्धेत चमकाल. धंद्यात वाढ होईल. नोकरी मिळेल.

कर्क : धंद्यात मोठे काम मिळेल. नम्रपणे गोड बोला. नोकर माणसांना कठोर शब्दात बोलू नका. नोकरीत फायदा होईल.

सिंह : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात लक्ष द्या. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकारणात चौफेर लक्ष देण्याचा त्रास वाढेल.

कन्या : थट्टा-मस्करी करताना प्रसंगाचे भान ठेवा. खर्चावर बंधन ठेवता येणार नाही. व्यसनाने घरात तणाव होऊ शकतो.

तूळ : तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा पटवून देताना प्रयत्न करावे लागतील. प्रेमाची माणसे भेटतील. धंद्यात फायदा होणार, काम मिळेल.

वृश्चिक : शेजारी तुमच्या कामात ढवळाढवळ करेल. नको असलेली व्यक्ती भेटण्यास येईल. पोटाची काळजी घ्या. वाद होऊ शकतो.

धनु : धंद्यात मोठे काम मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल. नोकरीत बदलीचा प्रश्न सुखकारक ठरू शकतो.

मकर : राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. नावलौकीक मिळेल. नवीन ओळखी होतील. सहवास फायद्याचा ठरेल.

कुंभ : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. राजकारणात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. लोकप्रियता मिळेल असे काम करा.

मीन : किरोकळ कारणाने काम होण्यास विलंब होईल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ करता येईल. हिशोब नीट करा. ओळखी होतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!