भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

राशिभविष्य ; आज बुधवार ८ फेब्रुवारी २०२३, कसा असेल आपला आजचा दिवस

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा।आज बुधवार ८ फेब्रुवारी २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष ः- पूर्वग्रह दूषितांचा गैरसमज वेळच्या वेळी दूर करा. नवीन ओळख होईल. धंदा मिळेल.

वृषभ ः- वरिष्ठांची मानसिकता पाहून तुम्ही तुमचे काम त्यांना सांगा. धंद्यात लक्ष ठेवा. मौज-मजा कराल.

मिथुन ः- महत्त्वाचे काम करण्यात यश मिळेल. चर्चा करता येईल. धंद्यात फायदा होईल.

कर्क ः- मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यातील तणाव व समस्या कमी करू शकाल. मैत्री वाढेल.

सिंह ः- क्षुल्लक कारणाने गैरसमज होईल. रस्त्याने चालताना विचार करत चालू नका. सावध रहा.

कन्या ः- घरातील समस्या कमी करू शकाल. नोकरीत जवळच्या लोकांना मदत करावी लागेल. खर्च वाढेल.

तूळ ः- जीवनसाथीच्या प्रगतीची खबर मिळेल. नातलग भेटतील. समारंभात हजर रहाल. धंदा वाढेल.

वृश्चिक ः- प्रवासाचा बेत ठरवाल. धंद्यात धाडसी निर्णय घेण्याचे ठरवाल. कलाक्षेत्रात ओळख वाढेल.

धनु ः- मुले, नातवंडे यांची भेट घडेल. महत्त्वाचा फोन येईल. घराची शोध मोहीम पूर्ण कराल.

मकर ः- घरातील व्यक्तींना खूश कराल. सहलीचा आनंद घ्याल. तुमच्या कामातील अडचणी दूर होतील.

कुंभ ः- मुलांच्या बरोबर चर्चा करताना वादाकडे विषय जाण्याची शक्यता आहे. क्षुल्लक अडचणी प्रवासात येतील.

मीन ः- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!