राशीभविष्य : आज बुधवार २४ जानेवारी २०२४. मनावर दडपण येईल.आजचे काम उद्यासाठी ठेवू नका.मैत्रीत दुरावा येऊ शकतो, मनाला त्रास देणारी घटना घडेल.वाद घालू नका.
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज बुधवार २४ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष –
दुसर्यांचे विचार ऐकून घ्या. घाईत प्रश्न सुटणार नाही. तुम्ही थोडा काळ तटस्थ राहा. यश मिळेल.
वृषभ –
कठीण काम करा. धंद्यात मोठे काम मिळेल. मौज मजेत वेळ जाईल. नातलग भेटतील.
मिथुन –
फायदेशीर घटना घडेल. नवीन ओळख वाढेल. स्पर्धेत जिंकाल. चांगली बातमी मिळेल.
कर्क –
अपमानाकडे दुर्लक्ष करा. चांगले कार्य करत राहा. लोकांच्या उपयोगी पडा. संकटातून मार्ग शोधता येईल.
सिंह –
मनावर दडपण येईल. मोठे लोक आश्वासन देतील. काम करून घेणे कठीण पडेल. धंदा मिळवा.
कन्या –
आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. चर्चा सफल होईल. तुमचे डावपेच बरोबर उपयोगी येतील.
तूळ –
खाण्याची चैन कमीच करा. नोकरीत प्रतिष्ठा मिळेल. कुणालाही कमी लेखू नका. गोड बोला.
वृश्चिक –
तुमची कामे पटापट करून घ्या. मौज-मजेत वेळ जाईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
धनु –
धावपळ होईल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. शेजारी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे.
मकर –
घरातील व्यक्ती मदत करतील. तुम्ही तटस्थ रहा. वाटाघाटीत यश मिळेल. वाहन जपून चालवा.
कुंभ –
तुमच्या मनाला त्रास देणारी घटना घडेल. घरातील व्यक्ती स्वतंत्रपणे वागेल. वाद घालू नका.
मीन –
उद्याचे काम आजच करा. फायदा होईल. पद मिळेल. थकबाकी मिळवा. प्रेमाला चालना मिळेल