राशीभविष्य : आज बुधवार २२ नोव्हेंबर २०२३. आत्मविश्वास वाढेल,नव्या कार्याची सुरुवात कराल.मन प्रसन्न असेल,रंगावर नियंत्रण ठेवा,आनंदाची बातमी मिळेल
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज बुधवार २२ नोव्हेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष Aries :
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. मान-सन्मानात वाढ होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव येईल. आजचा शुभ रंग – पिवळा.
वृषभ Taurus :
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न असेल. खर्चात वाढ होईल. नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. भावंडांसोबत वेळ घालवाल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग – निळा.
मिथुन Gemini :
खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळा. नव्या कार्याची सुरुवात कराल. सोने-चांदीचे दागिने खरेदी कराल. संध्याकाळनंतर आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – लाल.
कर्क Cancer :
गुंतवणूक करण्यावर भर द्याल. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. कामात प्रगती दिसून येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घ्याल. आजचा शुभ रंग – हिरवा.
सिंह Leo :
गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारा सोबत बाहेर फिरायला जाल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – नारंगी.
कन्या Virgo :
भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. संपत्तीतून आर्थिक उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस धावपळीचा असण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – जांभळा.
तूळ Libra :
मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. नाते-संबंधात मधुरता निर्माण होईल. प्रेमी जोडप्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग – नारंगी.
वृश्चिक Scorpio;
भविष्याच्या योजनांसंदर्भात प्लानिंग कराल. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. आयटी आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल. तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग – राखाडी.
धनु Sagittarius : प्रियकरासोबत वेळ घालवाल. संध्याकाळनंतर आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणुकदारांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. वायफळ खर्च टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – लाल.
मकर Capricorn :
नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रांसोबत मिळून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. मित्रांसोबत वेळ घालवाल. नोकरीच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – जांभळा
कुंभ Aquarius :
नव्या कार्याची सुरुवात करु शकता. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कपड्याच्या व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. आजचा शुभ रंग – पांढरा.
मीन Pisces :
नव्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. गुंतवणुकदारांना मोठा लाभ होईल. नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग – लाल.