भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज सोमवार ११ डिसेंबर २०२३,धंद्यात दुर्लक्ष करू नका.भलत्याच लोकांचा सल्ला घेऊ नका.बोलण्यापेक्षा कामे करा.माणसे ओळखा. बोलण्यापेक्षा कामे करा

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार ११ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष ः-
घरातील व्यक्तीच्या सुखासाठी प्रयत्न करावे लागतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. थकबाकी मिळवा.

वृषभ ः-
प्रवासात दादागिरी करून चालणार नाही. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. खर्च होईल.

मिथुन ः-
नवे मित्र-मंडळ तयार होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला क्षेत्रात मन रमेल.

कर्क ः-
तुमच्या कामात मेहनत घ्या. प्रतिष्ठा टिकवा. भलत्याच लोकांचा सल्ला घेऊ नका. यश मिळेल.

सिंह ः-
कठीण काम करण्याचा प्रयत्न करता येईल. कर्जाचे काम ओळखीने होऊ शकेल.

कन्या ः-
तुमचा अंदाज बरोबर येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळून रहा. तुमचा फायदा होईल.

तूळ ः-
मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात नवा विचार करावा लागेल. पदाधिकार मिळेल.

वृश्चिक ः-
वरिष्ठांना उद्धटपणे बोलू नका. धंद्यात आळस करू नका. बोलण्यापेक्षा कामे करा.

धनु ः-
आत्मविश्वासाने महत्त्वाचा निर्णय घ्याल. घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. जुने स्नेही भेटतील.

मकर ः-
तुमच्या आधाराने काही लोक मोठे होतात व शेवटी तुम्हाला दगा देतात. माणसे ओळखा.

कुंभ ः-
कुटुंबाच्या सुखासाठी नवा पर्याय शोधून काढाल. प्रवासाचा आनंद घ्याल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मीन ः-
ठरविलेला कार्यक्रम अचानक बदलावा लागेल. मित्राला मदत करावी लागेल. व्यवहारात लक्ष द्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!