राशीभविष्य : आज सोमवार १ जानेवारी २०२४,वर्चस्व वाढेल, कामाचे श्रेय मिळेल,मित्र मदत करतीलच असे गृहीत धरू नका,नम्र पणा सोडू नका,कल्पनाशक्ती वाढेल, आत्मविश्वास कायम ठेवा
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार १ जानेवारी २०२४, इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष :
विचारांना दिशा देणारा विचार जवळचे लोक देतील. आत्मविश्वास कायम ठेवा. धंद्यात आळस करू नका.
वृषभ :
तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांची मदत उपयोगी पडेल.
मिथुन :
खचून जाऊ नका. रागावर ताबा ठेवा. खाण्याचे तंत्र सांभाळा. वरिष्ठांचा विचार ऐकून घ्या.
कर्क :
आज ठरविलेल्या भेटीत व चर्चेत यश मिळेल. तुमचा प्रभाव दिसून येईल. कल्पनाशक्ती वाढेल.
सिंह :
शत्रूला वश करण्यात यश मिळेल. नवा परिचय उत्साहवर्धक ठरेल. कोर्टाचे काम होईल.
कन्या :
धंद्यात हलगर्जीपणा करू नका. फायदा होईल. जवळच्या व्यक्तींचा विचार ऐकून घ्या. दिशा मिळेल.
तूळ :
दडपणाखाली रहाल. अचानक कुणीतरी तुम्हाला दुखावण्याची शक्यता आहे. नम्रपणा सोडू नका.
वृश्चिक :
आजचे काम उद्यावर टाकू नका. मित्र मदत करतीलच असे गृहीत धरू नका. सहाय्य मात्र मिळेल.
धनु :
कामाचा व्याप वाढेल. तुमच्यावर टीका केली जाईल. क्षुल्लक कारणाने वाद वाढू शकतो.
मकर :
दुसर्यांचे विचार ऐकून घ्या. त्यातूनच तुम्हाला नवा मार्ग सापडेल. गुप्त कारवायांना रोखता येईल.
कुंभ :
तुम्ही घेतलेले श्रम सत्कारणी लागतील. तुमच्या कामाचा मोबदला अथवा श्रेय मिळेलच असे नाही.
मीन :
वर्चस्व वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. कामगार चांगले काम करतील. आनंदी रहाल.