भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज शनिवार १६ डिसेंबर २०२३,काम पूर्ण होईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, अनावश्यक खर्च वाढू शकतो, वादविवाद व संघर्ष टाळा,नवीन संधी मिळतील, रखडलेली कामे पूर्ण होतील

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शनिवार १६ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries) :
आज कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात व्यावसायिकाशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या कामाच्या कौशल्याने तुम्ही तुमच्या शत्रूंवर सहज विजय मिळवाल. आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकाल.उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.

वृषभ (Taurus) :
रखडलेल्या कामाची काळजी करू नका. काम पूर्ण होईल. कर्मचाऱ्यांशी काही कामाबाबत वाद होऊ शकतो. मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल.उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा.

मिथुन (Gemini) :
आज कर्जाची चिंता वाढू शकते. नशिबाची संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळू शकतो.उपाय : दुर्गादेवीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा.

कर्क (Cancer) :
व्यावसायिक व्यक्तींसाठी आजचा दिवस खास असेल. काही खास डील्स फायनल होतील. अनावश्यक खर्च वाढू शकतो. नोकरदार व्यक्तींनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.

सिंह (Leo) :
सुरू असलेले प्रकल्प आणि कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आज कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा संघर्ष टाळा. आज गुंतवणूक करणं टाळणं श्रेयस्कर. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.उपाय : शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची सेवा करा.

कन्या (Virgo) :
ऑफिसमध्ये राग आणि तणावाची परिस्थिती राहील. कुटुंबातल्या सदस्यांशी पैशांबाबत वाद होऊ शकतो. भावनेच्या आहारी जाऊन कोणतंही काम करू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकेल.उपाय : पीठ आणि साखर एकत्र करून मुंग्यांना खाऊ घाला.

तूळ (Libra) :
नवीन कामं आणि नवीन बिझनेस डील्स येतील. समस्यांना तोंड देण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. आज नवीन ऑफरदेखील मिळू शकते. कामाला विचारपूर्वक सुरुवात करा. लवकरच तुमचं काम पूर्ण होईल.उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी गोड खाऊ घाला.

वृश्चिक (Scorpio) :
नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना आज नवीन संधी मिळतील. व्यवसायात काही नवीन प्लॅन्सवर काम सुरू होऊ शकतं. आज महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते.उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

धनू (Sagittarius) : आजचा दिवस फायद्याचा आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये सतर्क राहा. कार्यक्षेत्रात प्रभाव पाडण्याच्या आणि वैभव मिळवण्याच्या संधी मिळतील. अडथळे किंवा विरोध असतानाही काम पूर्ण करून सिद्ध करून दाखवाल.उपाय : तांबड्या गायीला गूळ खाऊ घाला.

मकर (Capricorn) : कोणत्याही व्यक्तीकडून, बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घ्यायचं असेल तर आज घेऊ नका. आज घेतलेलं कर्ज फेडणं कठीण होईल. जुन्या मित्रांची साथ मिळेल आणि चांगले मित्रही वाढतील.उपाय : सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांचा हार घाला.

कुंभ (Aquarius) :
आज तुम्हाला निर्णयक्षमतेचा फायदा होऊ शकतो. रखडलेली कामं आज पूर्ण होतील. एखाद्या कामात गुंतवणूक करायची असेल तर ती मनापासून करा. भविष्यात तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळेल. आर्थिक प्रश्न सुटतील.उपाय : राम मंदिरात ध्वज अर्पण करा.

मीन (Pisces) :
नवीन कार्यालयात जाण्यासाठी किंवा नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. नेहमीच्या कामातून पैसे मिळू शकतात. आज तुम्ही कर्ज घेण्यासाठी मनाची तयारी करू शकता. बिझनेस पार्टनर किंवा जवळच्या सहकाऱ्याचा त्रास होऊ शकतो.उपाय : हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!