भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज शनिवार २० जानेवारी २०२४.प्रलंबित कामे मार्गी लागतील,टिकाकारांकडे दुर्लक्ष करा, चांगली बातमी ऐकायला मिळेल

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शनिवार २० जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries) :
दिवसाची सुरुवात समस्यांनी होईल. पण नंतर सर्व गोष्टी अपेक्षेनुसार होतील. त्यामुळे प्रलंबित कामं मार्गी लागतील. मनात असलेल्या समस्यांवर उपाय मिळेल. जवळच्या व्यक्ती किंवा नातेवाईकांशी व्यवसायासंबंधी चर्चा टाळा अन्यथा ते सुरू असलेल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या मुलांच्या भवितव्याबाबत चिंतेत रहाल. पण मुलांना चांगली नोकरी असल्याने त्यांच्या भविष्यासंबंधी चिंतांवर उपाय मिळेल.

वृषभ (Taurus) :
आज आजूबाजूचं वातावरण आनंददायी असेल. गोड बोलण्यानं कुटुंबातील सदस्यांची मनं जिंकाल. त्यामुळे कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. कुटुंबात ऐक्य वाढेल आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल. या संदर्भात एखादी चांगली बातमी समजेल. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यात तुम्हाला यश मिळू शकेल.

मिथुन (Gemini) :
दिवस व्यस्ततेचा असेल. व्यवसायात प्रलंबित कामं पूर्ण कराल. घरात बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं कराल. यासाठी तुम्ही तुमच्या मुलांची मदत घेऊ शकता. आज आळस बाजूला ठेवून कामांवर लक्ष केंद्रित करावं लागेल तरच यश मिळेल. तुमच्या आईकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. नातेवाईकाकडून एखादी वाईट बातमी ऐकायला मिळेल आणि त्यासाठी प्रवास करावा लागेल. त्यामुळे तुमचं मन उदास होईल. असं घडलं तर भाऊ किंवा वडिलांना सोबत घेऊन प्रवास करा.

कर्क (Cancer) :
दिवस फलदायी असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तरच त्यांना यश मिळेल अन्यथा ते परीक्षेत अनुत्तीर्ण होऊ शकतात. प्रतिष्ठा आणि प्रेमासाठी खर्च कराल. त्यामुळे शत्रूलाही तुमचा हेवा वाटेल. टीकाकारांकडे दुर्लक्ष करा. लव्ह लाइफमध्ये जोडीदारासोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता. पण या करिता कुटुंबातील सदस्यांची परवानगी अवश्य घ्या. नातेवाईकांना पैसे दिले असतील तर ते आज परत मिळू शकतात.

सिंह (Leo) :
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घरापासून दूर जावं लागेल. यासाठी शिक्षक आणि ज्येष्ठ व्यक्तींचं सहकार्य मिळेल आणि त्यांच्यामुळे शिक्षणातील अडचणी देखील संपतील. परदेशाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार काही योजना समजतील. नवीन मालमत्तेत पैसे गुंतवायचे असतील तर काही काळ प्रतीक्षा करणं फायदेशीर ठरेल अन्यथा करार तोट्यात जाऊ शकतो. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून एखादी चांगली माहिती समजेल. आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीबाबत जागरूक राहावं लागेल.

कन्या (Virgo) :
कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं ऐकून तुमचं मन व्यथित होऊ शकतं. त्यामुळे फार विचार न करणं फायदेशीर ठरेल. कोणताही निर्णय हुशारी आणि विवेकानं घ्या. निर्णय घेताना कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. मालमत्तेशी संबंधित एखादं प्रकरण दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर ते सोडवण्यात यश मिळेल. संध्याकाळी घराच्या देखभाल किंवा सजावटीवर खर्च होईल. यासाठी जोडीदारासोबत खरेदीसाठी जाल.

तूळ (Libra) :
दिवस सकारात्मक रिझल्ट देणारा असेल. सामाजिक स्तरावर चांगले रिझल्ट मिळतील. ऑफिसमध्ये महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात व्यस्त राहाल. व्यवसायात तुमच्या आनंदी स्वभावामुळे मित्र आणि शत्रूही वाढू शकतात. अशा व्यक्तींना वेळीच ओळखा तरच तुम्ही त्यांच्याशी सामना करू शकाल. जुन्या कर्जाची परतफेड करू शकाल. त्यामुळे तुम्हाला काहीसा दिलासा मिळू शकेल. मुलांची प्रगती पाहून कौतुक वाटेल.

वृश्चिक (Scorpio) :
दिवस व्यस्ततेचा असेल. काम करणाऱ्या व्यक्तींकडे एखादं महत्त्वाचं काम सोपवलं जाऊ शकतं. या कामासाठी त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीची गरज भासेल. मेहनत आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण कराल. समाजातल्या वाईट गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल. तुम्ही त्यावर उपाय शोधाल. पण या करिता तुम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही काळ थांबा अन्यथा कर्ज फेडणं अवघड होईल. तुम्ही तुमच्या मुलाला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी खर्चाचा विचार करा.

धनू (Sagittarius) : दिवसभरात अनेक अडचणी जाणवतील. तुमचा वाढता खर्च तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे पैसे विचारपूर्वक खर्च करा अन्यथा बजेटदेखील बिघडू शकतं. यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी जाणवू शकतात. भावाबहिणींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे अनेक दिवसांपासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना आज चांगली संधी मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी अधिकारी वर्गाशी वाद घालू नये, अन्यथा ही गोष्ट पदोन्नतीत अडथळा आणू शकते.

मकर (Capricorn) :
दिवस मध्यम फलदायी असेल. तुम्ही कोणतंही नवं काम हाती घेणं टाळा अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. भावंडांशी वाद असेल तर तो मिटेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळतील. यामुळे राजकीय करिअर चांगले होईल. संध्याकाळी सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर त्यादरम्यान तुमची आवडती वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याकडे नीट लक्ष द्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक परीक्षेत अपेक्षित मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल.

कुंभ (Aquarius) :
नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. कारण आज त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. जर नोकरदार व्यक्तीने अर्धवेळ काम करण्याचं ठरवलं असेल तर तशी संधी मिळू शकते. लहान व्यावसायिकांना त्यांच्या वडिलांच्या सल्ल्याचा फायदा होईल. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. संध्याकाळी एखाद्या मित्राला त्याच्या घरी भेटायला जाल. कौटुंबिक जीवनात जोडीदारासोबत थोडा वेळ एकांतात घालवाल.

मीन (Pisces) :
आज प्रत्येक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. पैसे कुठे गुंतवले असतील किंवा कुणाला दिले असतील तर ते आज परत मिळतील. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल आणि तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येतील. सामाजिक कार्यक्रमात गेलात तर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या मित्राचं मन दुखावलं जाऊ शकतं. संध्याकाळचा वेळ अभ्यासात घालवाल. एखाद्या जुन्या मित्राची भेट झाली तर तुम्हाला आनंद वाटेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!