राशीभविष्य : आज रविवार १७ डिसेंबर २०२३,घाईनं आणि भावनेच्याभरात निर्णय घेऊ नका, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता,प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं, पैशांचे व्यवहार सावधपणे करा, अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज रविवार १७ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष (Aries) :
आज तुम्हाला इतरांची मदत करून समाधान मिळेल. पण ऑफिसात तुमच्या संताप आणि दराऱ्यामुळे सगळे चिडीचूप होतील. जर तुम्ही एखाद्याकडे पैसे उसने मागितले तर ते सहज मिळतील. तुमच्या मित्रांसोबत बसून गप्पा मारण्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल. पण, तुम्ही असं करू नका नाहीतर तुमचं एखाद महत्त्वाचं काम मागे पडू शकतं. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून व्यवसायाशी संबंधित सल्ला घ्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो. जोडीदाराशी संबंध सुधारतील.
वृषभ (Taurus) :
आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवू शकता. कुटुंबातील सदस्याने केलेल्या एखाद्या कामामुळे तुमच्या कुटुंबाला प्रसिद्धी मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण, तुमच्या तब्येतीत काही बिघाड झाल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जे लोक दीर्घकाळापासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील तर तुम्हाला ते परत मिळतील.
मिथुन (Gemini) :
आज तुमची संपत्तिक स्थिती उत्तम असेल. संध्याकाळी एखाद्या थोर व्यक्तीची भेट झाल्याने तुमचं मनोबल वाढू शकतं. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद संपवण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात आणि त्यामुळे तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कनिष्ठांकडून झालेल्या चुकांमुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. सहलीला जायचं असेल तर तुमच्या आवडत्या वस्तू सुरक्षित ठेवा. त्या हरवण्याची शक्यता असेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी कळू शकते.
कर्क (Cancer) :
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. व्यावसायिक योजनांनाही आज गती मिळू शकते. आज तुम्ही घाईनं आणि भावनेच्याभरात निर्णय घेतल्यास तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह देवदर्शनाला जाऊ शकता. आज राजकीय प्रतिष्ठा वाढू शकते. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी केली तर ती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न ठरू शकतं.
सिंह (Leo) :
आज तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने मन प्रसन्न राहील. राजकारणात तुम्हाला अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर पोटासंबंधी समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्यावं लागेल आणि जास्त तळलेले अन्नपदार्थ टाळावे लागतील. तुमच्या प्रियजनांसोबत हसत आणि मस्करी करण्यात संध्याकाळ घालवू शकता.
कन्या (Virgo) :
आज तुम्ही दानधर्म करण्यात व्यस्त असाल. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कृतीतून लाभ मिळू शकतात. पण, व्यवसायात केलेल्या भूतकाळातील चुकांबद्दल पश्चाताप होऊ शकतो. प्रतिस्पर्धी तुमची डोकेदुखी ठरू शकतात. दिवसातील काही वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यातही घालवू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सहलीला घेऊन जाऊ शकता. पण, तुम्हाला आज तुमच्या संपत्तीचाही विचार करावा लागेल. तरच तुम्ही भविष्यात नफा मिळवू शकाल. सरकारी नोकरीत काम करणारे लोक पदोन्नती मिळाल्यानंतर आनंदी होऊ शकतात.
तूळ (Libra) :
आज शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळवण्याची संधी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सावध राहावं लागेल कारण त्यांचे विरोधक त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे घाई-गडबड होऊ शकते. हवामानामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला थोड्या नफ्यासाठी अनेक संधी मिळू शकतात. तुम्ही त्या ओळखून कृती केली तरच नफा कमवू शकाल. तुमच्या मुलांनी चांगलं काम केलं तर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल.
वृश्चिक (Scorpio) :
आजचा दिवस तुमची प्रसिद्धी आणि वैभव वाढवणारा आहे. तुमचं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागल्यास, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर शत्रू त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत मजा करण्यात थोडा वेळ घालवू शकता. पण, तुमच्या व्यवसायाच्या योजनांवरही लक्ष केंद्रीत करा. राजकारणी व्यक्ती नवीन पक्षात जाऊ शकतात. गुंतवणुकीशी संबंधित एखादी योजना करत असाल तर तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्यामध्ये गुंतवणूक करा.
धनू (Sagittarius) :
आज तुमच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. एखाद्या सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. उपयुक्त वस्तूंची खरेदी करू शकता. कोर्टात तुमचा एखादा खटला सुरू असेल तर खूप धावपळीनंतरच तुम्हाला विजय मिळवता येईल. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल.
मकर (Capricorn) :
आजचा दिवस तुमच्या व्यावसायिक क्षेत्रासाठी लाभदायक ठरू शकतो. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सहलीला गेल्यास वाहन वापरताना काळजी घ्यावी लागेल नाहीतर अपघाताचा धोका आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू केल्यास त्यात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना त्यात यश मिळू शकते.
कुंभ (Aquarius) :
आजचा दिवस तुम्ही खूप व्यस्त असाल. मालमत्ता खरेदी करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही धावपळीत असाल आणि तुमचा आर्थिक खर्चही वाढू शकतो. तुमच्या जोडीदाराला आज शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यासाठी तुम्हाला कुटुंबातील सदस्याची मदत घ्यावी लागेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सार्वजनिक सभा घेण्याची संधी मिळू शकते. कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवणं टाळा नाहीतर ती तुमचा विश्वासघात करू शकते. तुमच्या आईला दिलेलं वचन पूर्ण करावं लागेल.
मीन (Pisces) :
कौटुंबिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक ओझ्यांपासून सुटका होईल. संध्याकाळच्या प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. ती तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यावसायिक लोकांची प्रगती पाहून त्यांचे कुटुंब आनंदी होऊ शकतं. कोणतेही काम पालकांचा सल्ला घेऊनच करणं योग्य ठरेल. तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप रिलॅक्स असाल.