भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज गुरूवार ४ जानेवारी २०२४, निराशाजनक बातम्या समजतील,मानसिक तणाव वाढेल,अविवाहित व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते,मन समाधानी राहील,कटू बोलणं टाळा

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज गुरूवार ४ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries) :
दिवस मध्यम फलदायी असेल. घरातल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन त्या वेळेत पूर्ण कराव्या लागतील. मुलांकडून काही निराशाजनक बातम्या समजतील. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांकडून काम करून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या काही चुका माफ कराव्या लागतील, तरच काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कर्ज घेण्याचा विचार असेल तर ते सहज मिळेल. जोखमीचं काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

वृषभ (Taurus) :
दिवस उत्साहाचा असेल. कौशल्य आणि भागीदारीत केलेल्या कामात चांगले पैसे मिळतील. कुटुंबातल्या लहान मुलांसोबत थोडा वेळ घालवाल. कोणत्याही सामाजिक योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार असेल, तर त्यात निराशा हाती येईल. कामाच्या ठिकाणी एकामागून एक लाभदायक संधी मिळतील. भागीदारीत व्यवसाय करत असलात, तर त्यातून अपेक्षित नफा मिळेल. परदेशात राहणाऱ्या कुटुंबातल्या सदस्याकडून चांगली बातमी मिळेल.

मिथुन (Gemini) :
दिवस खास असेल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील. त्यांच्या मनात भीती राहणार नाही. दीर्घ काळापासून त्रास देत असलेली पैशाची समस्या सुटेल. तुमच्या मनात एखादा मुद्दा आला, तर तो कुटुंबातल्या सदस्यांसमोर नक्की मांडा, तरच तुम्ही एखाद्या समस्येवर उपाय शोधू शकाल. तुमच्या मुलाला नवीन व्यवसायाची ओळख करून देऊ शकता. मालमत्ता खरेदीची इच्छा पूर्ण होईल. आईकडून तुम्हाला विशेष आदर मिळेल.

कर्क (Cancer) :
दिवस महत्त्वाचा असेल. कारण कोणताही कायदेशीर खटला सुरू असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. नोकरीत कनिष्ठांकडून फसवणूक होऊ शकते. कोणाकडून पैसे घेतले तर फेडणं कठीण होऊ शकतं. भविष्य लक्षात घेऊन कोणताही करार अंतिम करावा लागेल. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. एखाद्या प्रिय मित्राशी भांडण होऊ शकतं. जोडीदाराचा सासरच्या लोकांशी समेट घडवून आणू शकता.

सिंह (Leo) :
दिवस समस्यांनी भरलेला असू शकतो. कोणतीही गोष्ट मनावर घेणं टाळावं, अन्यथा लोकांवर रागवाल. प्रिय व्यक्तीच्या मदतीनं कामात अपेक्षित लाभ मिळेल. दुपारी लंचदरम्यान व्यवसायातल्या काही नवीन योजनांवर चर्चा कराल. तुम्हाला कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. कारण त्यांना कामाच्या ठिकाणी आवडीचं काम सोपवलं जाऊ शकतं.

कन्या (Virgo) :
दिवस खर्चाचा असेल. त्यामुळे चिंता वाढेल. जोडीदाराच्या मदतीनं मालमत्ता मिळू शकते. देवाच्या कृपेनं तुमच्याकडून भरपूर काम होण्याची आशा आहे. कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यासोबत वाद होत असेल तर तो मिटवण्याचा प्रयत्न करा. घरातल्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुमची मदत होईल. वाढत्या खर्चामुळे मानसिक तणाव जाणवेल. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु, पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तूळ (Libra) :
दिवस सामान्य असेल. जोडीदार तुमच्यावर रागावू शकतो. त्याच्या चुका तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. कौटुंबिक व्यवसायात कोणाशी तरी सल्लामसलत करावी लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. काही सरकारी नियमांमुळे व्यवसाय करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. अविवाहित व्यक्तींसाठी चांगली संधी येऊ शकते. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी किंवा पद मिळू शकतं.

वृश्चिक (Scorpio) :
अनपेक्षित माध्यमातून पैसे मिळू शकतात. जुन्या मित्राला भेटून आनंद होईल. पालकांना देवदर्शनासाठी मंदिरात घेऊन जाऊ शकता. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करायला, तसंच त्यातून काही तरी चांगलं शिकायला मिळेल. व्यवसाय संथ गतीने चालत असेल तर पालकांचा किंवा भावांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचणींना सामोरं जावं लागेल.

धनू (Sagittarius) :
दिवस सकारात्मक परिणाम देईल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना लाभ मिळू शकतो. परंतु, तुम्हाला तुमचं अपूर्ण कामदेखील सांभाळावं लागेल, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. एखादी चांगली बातमी समजेल. त्यामुळे मन समाधानी राहील. मालमत्तेच्या सौद्यात चांगला नफा मिळेल. मानसिक समस्यांचा त्रास होत असेल तर त्यापासून आराम मिळेल.

मकर (Capricorn) :
आज साहस आणि शौर्यामध्ये वाढ होईल. करिअरसंदर्भात नवीन माहिती किंवा चांगली नोकरी मिळू शकेल. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून काही क्षण कुटुंबातल्या सदस्यांसोबत घालवाल. त्यामुळे त्यांची नाराजी दूर होईल. अनावश्यक समस्यांवर नियंत्रण ठेवावं लागेल. अन्यथा त्या समस्या त्रासाचं कारण बनू शकतात. तुम्ही जोडीदाराला बाहेर कुठे तरी फिरायला घेऊन जाऊ शकता.

कुंभ (Aquarius) :
दिवस सामान्य लाभाचा असेल. काही विशेष बाबींमध्ये विजय मिळवू शकता, ज्यासाठी तुम्ही बराच काळ प्रयत्न करत होतात. एखाद्यावर रागावला असाल तर कटू बोलणं टाळा अन्यथा ती व्यक्ती तुमच्यावर रागावू शकते. नोकरीत कामाबद्दल तुमचं कौतुक होईल. वरिष्ठांकडून पदोन्नती मिळू शकते. उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल. त्यातून चांगला नफा प्राप्त करू शकता; मात्र व्यवहारात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

मीन (Pisces) :
दिवस लाभदायक असेल. कुटुंबात भावा-बहिणींचं सहकार्य मिळेल; पण मित्रांसोबत मतभेद होतील. जोडीदारासोबत दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता. कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळा. अन्यथा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार यश मिळेल. पालकांना मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. अन्यथा त्यांना चुकीची संगत लागू शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!