भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज गुरुवार १४ डिसेंबर २०२३,अनपेक्षित घटना घडतील,दुःखद बातमी मिळण्याची शक्यता,लाभाच्या अनेक संधी मिळतील,कैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल,अप्रिय घटनांमुळे पेच निर्माण होईल,आज जास्त मोकळेपणाने वागू नका,रखडलेली बहुप्रतिक्षित कामे पूर्ण होण्याची शक्यता

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज गुरुवार १४ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries) :
आजचा दिवस संमिश्र असेल. कामात अपयश किंवा महत्त्वाचे करार रद्द झाल्याने चिडचिड होऊ शकते. दुपारपर्यंत तुमचं बोलणं कोरडं असेल. त्यामुळे कार्यक्षेत्र आणि घरातलं वातावरण बिघडेल. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक शक्ती वाढेल. दुपारी काही प्रतिष्ठित व्यक्तींचं सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कामात किंवा प्रकल्पात पैसे गुंतवणं टाळा. यात पैसे गमावण्याची दाट शक्यता आहे. दुपारच्या सुमारास तब्येतीत चढ-उतार होईल. कुटुंबातले सदस्य कोणत्याही कारणावरून तुमच्यावर रागावतील. काही नवीन किरकोळ आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

वृषभ (Taurus) :
कौटुंबिक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय मिळू शकेल. यात ज्येष्ठ व्यक्तीचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभेल. पूजेचं आयोजन कराल. व्यापार क्षेत्राकडे अधिक लक्ष दिल्याने कामं वेळेवर पूर्ण होतील. नोकरदार व्यक्ती आळसामुळे कामं अपूर्ण ठेवतील. जमीन-मालमत्ता किंवा सरकारी कामं भविष्यात प्रलंबित राहतील. त्यामुळे या गोष्टींवर आज वेळ न घालवणं हितावह ठरेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. धर्मादाय कार्यात खर्च कराल.

मिथुन (Gemini) :
अपूर्ण काम घाईत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल; पण घाईमुळे काही कामं बिघडू शकतात. कार्यक्षेत्रात चुकीचा राग दुसऱ्यावर काढल्याने वातावरण तापेल; पण बहुतांश कामं वेळेच्या पुढे मागे पूर्ण होतील. संध्याकाळी आर्थिक लाभाची इच्छा पूर्ण होईल. नोकरदार व्यक्ती कामातून दीर्घ विश्रांती घेण्यासाठी योजना आखतील. धार्मिक कार्यात रस घ्याल. ब्लॅक मॅजिकचे प्रयोग कराल. कौटुंबिक वातावरण साधारण राहील.

कर्क (Cancer) :
तुम्ही केलेलं नियोजन लवकरच पूर्ण होऊ शकतं. महत्त्वाची कामं सहजतेनं पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. कामाच्या व्यग्रतेमुळे घरातल्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात; मात्र आर्थिक लाभातून समाधान मिळेल. आरोग्य चांगलं राहू शकतं. धार्मिक गोष्टींवर विश्वास असला तरी तुम्ही त्यासाठी वेळ देऊ शकणार नाही; पण तुमचा रस तंत्रमंत्रात जास्त असेल. सर्वांना सोबत घेतल्याने आपुलकी आणि आदर मिळेल. घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्ती आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा. वैचारिक मतभेदांमुळे जोरदार वाद होऊ शकतात.

सिंह (Leo) : पैशांची कमतरता असूनही आनंदी राहण्याचा यशस्वी प्रयत्न कराल. समाधानी स्वभाव तुम्हाला अनावश्यक त्रासांपासून वाचवेल; पण महिला हट्ट पूर्ण झाल्याशिवाय ऐकणार नाहीत. घरातल्या वयोवृद्ध सदस्यांशी भावनिक नातं जपलं तर मनःशांती मिळेल. प्रेमप्रकरणापासून दूर राहा. अन्यथा पैसा किंवा कौटुंबिक सन्मानाची हानी होऊ शकते. एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाण्यामुळे जास्त पैसे खर्च होतील; मात्र आनंद मिळाल्याने खर्च वाया जाणार नाही. स्त्री बाजूकडून विशेष जवळीक राहील.

कन्या (Virgo) :
दिवसाच्या सुरुवातीचा टप्पा आळशीपणात जाईल. त्यानंतर उर्वरित दिवस बेफिकीरपणे राहूनही आनंद आणि शांततेत घालवाल. कोणतीही इच्छा पूर्ण झाल्याने मन आनंदी होईल. आजूबाजूचं वातावरण विनोदी राहील. मित्र किंवा प्रियजनांसोबत नियोजनावर मनमोकळी चर्चा कराल. दुपारनंतरचा काही काळ परिस्थिती त्रासदायक होईल. काही इच्छा अपूर्ण राहिल्याने मनाला त्रास होईल. त्यातून सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल. आज जास्त मोकळेपणानं वागू नका. तुमच्या मनातली गुपितं इतरांना समजली तर त्रास होईल. कुटुंबातल्या सदस्यांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधी किरकोळ समस्या राहतील.

तूळ (Libra) :
प्रत्येक कामात सावध राहा. घाईने घेतलेल्या निर्णयामुळे पैशासोबत आदरही कमी होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अप्रिय घटनांमुळे पेच निर्माण होईल. अचानक करार रद्द झाल्याने व्यावसायिकांना त्रास होऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस निराशाजनक असेल. कारण तुम्हाला गरजेवेळी कर्ज मिळणार नाही. कुटुंबातल्या सदस्याच्या चुकीच्या वागण्याने मन दुःखी राहील. मनात चुकीचे विचार आल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होईल. डोकं किंवा शरीराचे अन्य अवयव निष्क्रिय झाल्यासारखं जाणवेल. संयमाने दिवस घालवा.

वृश्चिक (Scorpio) :
दिवसाच्या पूर्वार्धात नवीन गुंतागुंत तयार होईल. हट्टीपणामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकतं. प्रियजनांपासून दूर राहावं लागू शकतं. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी नीट विचार करा. अन्यथा साधी गोष्ट चिघळायला वेळ लागणार नाही. घरातली महत्त्वाची कामं करा. कोणतंही काम तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा किंवा काही दिवसांसाठी पुढे ढकला. नोकरदारांच्या वर्तणुकीमुळे अडचणी येऊ शकतात. तुमचा निर्णय यशस्वी ठरला तर सकाळी तुमच्या विरोधात वागणारेही तुमचं हित जोपासू लागतील. अचानक आर्थिक लाभामुळे दिलासा मिळेल.

धनू (Sagittarius) :
जर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल तर तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील. परंतु अज्ञान किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे नफा संशयास्पद राहील. रखडलेली किंवा बहुप्रतिक्षित महत्त्वाची कामं पूर्ण होतील. मधूनमधून मिळणाऱ्या लाभातून संपत्ती जमवता येणार नाही. घरातल्या सुखसुविधा वाढतील. त्यावर खर्चही होईल. नोकरी, व्यवसायात नवीन संबंध निर्माण झाल्याने अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. आरोग्याच्या समस्यांमुळे काही काळ त्रास होईल.

मकर :
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना काही चांगले यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा घ्याल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामात मित्रांकडून सहकार्य मिळेल. यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तंत्रज्ञान आणि संवादाशी संबंधित लोकांना काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius) :
आज दिवस उलट परिणाम देईल. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडल्याने अनावश्यक चिंता किंवा औषधांवर खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मेहनतीनुसार लाभ मिळेल. कमी वेळेमुळे तुम्हाला नवीन कामाचा विस्तार करण्याचा विचार पुढे ढकलावा लागेल. आर्थिक कारणांमुळे सरकारी कामांवर पैसा खर्च होण्याची चिंता राहील. परंतु, दुपारच्या सुमारास काही पैशांची आवक झाल्याने रोजची कामं सुरू राहतील. दुपार किंवा संध्याकाळी काही दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज प्रतिकूल परिस्थिती असूनही कुटुंबात सुसंवाद राहील.

मीन (Pisces) :
आजचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त शुभ असेल. आर्थिक किंवा कौटुंबिक स्वरुपाच्या अनपेक्षित घटना घडतील; पण त्याचा परिणाम तुमच्या मनाप्रमाणे असेल. नोकरदार व्यक्तींना मेहनतीचं फळ मिळेल. मान-सन्मान वाढेल आणि उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. बेरोजगारांनी थोडे प्रयत्न केले तर त्यांना रोजगार मिळू शकतो; पण हात ढिला सुटल्याने अचानक खर्च होईल. परिणामी थोडी अस्वस्थता जाणवेल. तरीदेखील परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. यशाची शक्यता असेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तब्येत सुधारेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!