भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज मंगळवार २ जानेवारी २०२४,महत्त्वाचे काम आजच करा.उत्साह वाढेल.मन खंबीर करा.जवळचे लोक सांभाळून ठेवा.राग आवरा.चिडचिडेपणा वाढेल

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज मंगळवार २ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष –
महत्त्वाचे काम करून घेता येईल. कोर्टाच्या कामात सरस ठराल. धंद्यात वाढ करू शकाल.

वृषभ –
घरातील तणाव कमी करू शकाल. मनाने दुबळे बनू नका. मन खंबीर करा. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन –
उत्साह वाढेल. कुणालाही उद्धटपणे बोलू नका. वागण्यात चिडचिड येऊ शकते.

कर्क –
वाहन जपून चालवा. गुप्त कारवायांना ऊत आला आहे असे वाटेल. कायद्याचे पालन करा.

सिंह –
महत्त्वाचे काम आजच करा. प्रतिष्ठित लोकांची भेट घडेल. नवा डाव तयार करू शकाल.

कन्या –
धंद्यात कष्ट घ्या. कामगारांच्या बरोबर मैत्री करा. महत्त्वाचे काम करून घेता येईल.

तूळ –
दुसर्‍याची चूक जास्त काळ लक्षात ठेवू नये. स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. उत्साह वाढेल.

वृश्चिक –
चिडचिडेपणा वाढेल. कामाचा ताण असह्य होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तेच खा.

धनु –
ताण-तणावावर उपाय शोधता येईल. नातलग मंडळी मदत करतील. वरिष्ठांचा विचार ऐकून घ्या.

मकर –
विरोधकांना स्पष्ट शब्दांत समज द्याल. मैत्री तुटणार नाही याची काळजी घ्या. जवळचे लोक सांभाळून ठेवा.

कुंभ –
नोकरीत कामाचे तास वाढतील. सहकारी मदत करतील. नव्या विचाराने प्रेेरित व्हाल.

मीन –
घरातील कामे होतील. धंद्यात पैसा मिळेल. योग्य ठिकाणीच खर्च करा. राग आवरा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!