राशीभविष्य : आज मंगळवार ५ डिसेंबर २०२३,स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,वेळेचा पुरेपूर वापर करा,खूप कस्ट करावे लागतील, कामाचा ताण अधिक असेल,प्रयत्न यशस्वी होतील
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज मंगळवार ५ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष (Aries) :
कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे काम थांबणार नाही. नोकरदार व्यक्तींना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते; मात्र त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील.उपाय : श्री गणेशाची पूजा करा. हिरव्या वस्तू जवळ ठेवा.
वृषभ (Taurus) : भूतकाळातल्या नकारात्मक गोष्टींना वर्तमानावर वर्चस्व गाजवू देऊ नका. नोकरदार व्यक्तींना कामाचा ताण अधिक असेल. बिझनेस कार्यपद्धती सुधारण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. यासाठी स्वतःचं योगदान महत्त्वाचं आहे.उपाय : श्री गणेशाची पूजा करा. हिरव्या वस्तू जवळ ठेवा.
मिथुन (Gemini) :
एखाद्याला उधार दिलेले किंवा खूप दिवसांपासून अडकूबन पडलेले पैसे मिळाल्यानं तणाव दूर होईल. व्यावसायिक कामांना गती देण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. त्यासाठी काम नियोजनबद्ध पद्धतीनं करावं. नोकरदार व्यक्तींना, व्यावसायिकांना आज चांगली बातमी मिळेल.उपाय : कालिमातेची पूजा करा.
कर्क (Cancer) :
उत्कृष्ट कामगिरीची किंवा चांगल्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे उत्पादनात काही प्रमाणात घट होणार असली तरी त्याचा आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही. नोकरीत सहकाऱ्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका.उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
सिंह (Leo) :
हा काळ काही तरी साध्य करण्याचा आहे. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर वापर करा. व्यावसायिक कामात सुधारणा होईल. कर्मचाऱ्यांचं सहकार्य कायम राहील. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकार्यांशी उत्तम समन्वय राहील.उपाय : लाल रंगाची वस्तू जवळ ठेवा. श्री हनुमानाची पूजा करा.
कन्या (Virgo) :
सध्याच्या वातावरणामुळे कार्यपद्धती बदलली आहे. व्यवसायाशी संबंधित नवीन धोरणांची माहिती मिळवणं आवश्यक आहे. ऑफिसमधल्या कागदपत्रांची, फाइल्सची पूर्तता करा.आळसामुळे कोणतंही काम उद्यावर ढकलू नका. बिझनेस चांगला राहील.उपाय : निळ्या वस्तू दान करा.
तूळ (Libra) :
व्यवसायासंबंधी तुमचे काही विशेष प्लॅन्स लीक होऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांकडे, हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. नोकरदार व्यक्ती निष्काळजीपणामुळे काही गोष्टी गमावू शकतात, हे त्यांनी लक्षात ठेवावं.उपाय : श्री शनिदेवाच्या छत्रछायेखाली राहा.
वृश्चिक (Scorpio) :
सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नकारात्मक दृष्टिकोन तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. खासगी नोकरीत कामाचा ताण राहील.उपाय : गायीला चपाती/भाकरी खाऊ घाला.
धनू (Sagittarius) :
नवीन मशिनरी किंवा नवीन टेक्नॉलॉजी वापरण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा होईल. विस्ताराच्या योजना काम करतील. ऑफिसमधलं वातावरण व परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. ऑफिशियल टूर होण्याची शक्यता आहे.उपाय : श्री हनुमानाची पूजा करा.
मकर (Capricorn) : व्यवसायात खूप कष्ट करावे लागणार आहेत. त्याकडे लक्ष द्यावं. व्यवसायात सुरुवातीच्या काळात निर्णय घेण्यात अडचणी येतील. त्यामुळे अपेक्षित नफा मिळू शकत नाही. नोकरदार व्यक्तींची प्रगती होऊ शकते.उपाय : कालिमातेची पूजा करा.
कुंभ (Aquarius) :
मार्केटिंग आणि नेटवर्किंगसारख्या कामांकडे व्यवसायात अधिक लक्ष द्या. प्राप्तिकर, विक्रीकर इत्यादींशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अकाउंट बुकमध्ये पारदर्शकता ठेवा. कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याबाबत सखोल चौकशी, तपास करा.उपाय : श्री शंकराला जल अर्पण करा.
मीन (Pisces) :
कामाच्या क्षेत्रात योग्य अरेंजमेंट राहील आणि सकारात्मक परिणामही दिसतील. परंतु शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या गोड बोलण्यावर अगदी सहज विश्वास ठेवू नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.उपाय : पिवळ्या वस्तू जवळ ठेवा.