राशीभविष्य : आज मंगळवार २३ जानेवारी २०२४,कोणताही निर्णय उत्साहाच्याभरात घेऊ नका,पश्चाताप करावा लगेल
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज मंगळवार २३ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष (Aries) :
आजचा दिवस खर्च वाढवणारा असेल. ज्या व्यक्ती परदेशी कंपनीत काम करत आहेत त्यांना एखादं गिफ्ट मिळू शकतं. काही व्यक्तींना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात जावं लागू शकतं. कौटुंबिक वातावरण त्रासदायक असेल. आयात-निर्यातीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना व्यवसायात तेजी अनुभवायला मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी जवळच्या ठिकाणी सहलीला जाऊ शकता. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ते अवश्य गुंतवा.
वृषभ (Taurus) :
आज पालकांशी काही वाद झाला तर त्यावेळी मौन बाळगा.आज घरातल्या व्यक्तींच्या बोलण्याकडे लक्ष द्या. कारण यातून तुम्हाला एखादं रहस्य उलगडू शकतं. जमीन किंवा वाहन खरेदीची तयारी करू शकता. जोडीदाराची प्रगती पाहून आनंद वाटेल. संध्याकाळी घरी पाहुणे येऊ शकतात. त्यामुळे कुटुंबीय व्यस्त राहतील.
मिथुन (Gemini) :
व्यवसाय धीम्या गतीने सुरू असल्याने थोडी चिंता वाटेल. त्यासाठी वडील किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही समस्यांमधून मुक्त व्हाल. नोकरदार व्यक्तींनी सावधगिरीने काम करावं अन्यथा त्यांची कामं पूर्ण होण्यास उशीर लागू शकतो. त्यामुळे वडिलांकडून फटकारलं जाऊ शकतं. नशिबाच्या जोरावर समस्यांमधून यशस्वीपणे मुक्त व्हाल. तुमच्या मुलाला एखादा कोर्स करायचा असेल तर त्यासाठी अर्ज करू शकता.
कर्क (Cancer) :
दिवस अत्यंत फलदायी असेल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील. लव्ह लाइफमध्ये, प्रेयसीकडून एखादी चांगली बातमी समजेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील अडचणी सोडवण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी. उत्पन्न लक्षात घेत पैसे खर्च करा अन्यथा बॅलन्स कमी होऊन आर्थिक परिस्थिती डळमळीत होऊ शकते. त्यामुळे खरेदी करताना सावधगिरी बाळगा.
सिंह (Leo) :
पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक रहा. जर घरीच एखादा पदार्थ किंवा मिठाई तयार केली असेल तर खाताना जास्त काळजी घ्या. संध्याकाळी मुलं बाहेर जाण्यासाठी तुमच्याकडे हट्ट करू शकतात. तुम्ही त्यांना फिरायला किंवा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जाल. पण घराबाहेर जाताना विशेष काळजी घ्या कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला एखादं आवडीचं काम मिळू शकतं.
कन्या (Virgo) :
तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कारण एखादं जुनं कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर दुपारी त्याबाबत तुमच्या बाजूने निर्णय लागू शकतो. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. आज तुम्ही एखादी छोटी पार्टी आयोजित करू शकता. तुम्हाला तुमच्या गोष्टींसाठी वेळ देता येणार नाही. त्यामुळे एखादे महत्त्वाचे काम पुढे ढकलले जाईल. संध्याकाळी आईला आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या समस्या वाढल्या तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.
तूळ (Libra) :
दिवस सामान्य असेल. जुन्या एखाद्या मित्राला भेटून आनंद वाटेल. पण त्याच्याशी संवाद साधताना काळजी घ्या. भावनेच्याभरात काही बोललात तर मित्राचं मन दुखवू शकतं. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे तुमचे प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात समन्वय राखण्याची गरज आहे अन्यथा सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात. तुम्ही चैनीसाठी पैसे खर्च करण्याचा विचार करत असाल तर असा खर्च करू शकाल.
वृश्चिक (Scorpio) : विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. त्यांना शैक्षणिक यश मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. लव्ह लाइफमध्ये असलेल्या व्यक्ती जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकतात; पण जाण्यापूर्वी कुटुंबियांना माहिती द्या. व्यवसायातील समस्या मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या मदतीने सोडवाल. सासरच्या व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना नीट विचार करा नाहीतर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो
धनू (Sagittarius) :
दिवस मध्यम फलदायी असेल. कुटुंबातल्या सदस्यांशी मतभेद झाले असतील तर आज संपतील. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात वाद निर्माण झाला असेल तर भांडण्याऐवजी कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून तो सोडवा अन्यथा वाद बराच काळ टिकून राहील. लहान मुलं तुमच्याकडे भेटवस्तूची मागणी करू शकतात. तुम्ही ती पूर्ण कराल. कोणावरही विश्वास ठेवण्याआधी समोरची व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही याकडे लक्ष द्या नाहीतर नंतर तुमची फसवणूक होऊ शकते.
मकर (Capricorn) :
कौटुंबिक जीवनात संतुलन राखाल. कोणताही निर्णय उत्साहाच्याभरात घेऊ नका अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. एखादं प्रलंबित काम मित्र किंवा नातेवाईकांशी बोलून पूर्ण करू शकता. संध्याकाळी जोडीदारासमवेत आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता. मात्र त्यासाठी आर्थिक नियोजन करावं लागेल नाहीतर नंतर पैशाची चिंता भेडसावू शकते.
कुंभ (Aquarius) :
बोलण्यात गोडवा असल्याने आजूबाजूचे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे मित्रांची संख्या वाढेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी या गोष्टीचा फायदा होईल. आज फार महत्त्वाचं काम नसल्याने कुटुंबासोबत थोडा वेळ घालवाल. आई-वडिलांच्या तब्येतीमुळे काही लोकांची आवर्जून भेट घ्यावी लागेल. काही काळापूर्वी तुम्ही जर शेअर मार्केट, लॉटरी आदी गोष्टींमध्ये गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळू शकेल.
मीन (Pisces) :
दिवस आनंद वाढवणारा असेल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. यात तुम्ही प्रगती होईल आणि मोठा आर्थिक नफा मिळेल. यामुळे तुमचा मानसिक भार कमी होऊन आनंद वाटेल. सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर कुटुंबातील सदस्यांसोबत सल्लामसलत केल्यानंतर प्रवासाला निघा. यामुळे प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल. प्रवासात मौल्यवान आणि महत्त्वाच्या वस्तू जपा अन्यथा त्या हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुमची एखादी आवडती वस्तू चोरीला जाऊ शकते. त्यामुळे योग्य काळजी घ्या.