राशीभविष्य : आज मंगळवार १० आक्टोबर २०२३. नवीन संधी मिळतील, खर्च जपून करा, शांत रहा, नैराश्याचा झटका येऊ शकतो
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज मंगळवार १० आक्टोबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष –
आज दिवस आनंदात घालवा. राशीतील गुरू पंचम चंद्र प्रसिद्धी आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व देईल. घरामध्ये सत्संग घडेल. षष्ठात रवि येत्या काही दिवसात नोकरीसाठी शुभ समाचार देईल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.
वृषभ –
व्यय राहू गुरू-योग असून काही तणावाचे प्रसंग येतील. जपून रहा. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, नातेवाईक भेट संभवते. चतुर्थ चंद्र घरात विशेष घटना घडतील. जोडीदारासोबत वेळ घालवा. दिवस मध्यम.
मिथुन –
तृतीय स्थानात चंद्र आहे. काही कारणाने नोकरीमध्ये ताणाचे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कार्य करताना विचार करा. संतती व्यग्र राहील. प्रवास, भावंडं भेट घडेल. व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.
कर्क –
दशम गुरू आणि चंद्र स्थान व नोकरीत बदल करेल. वैवाहिक जीवनात जपून राहण्याचे संकेत आहेत. व्यवसायात लाभ होईल. संतती सौख्य मिळेल. घरामध्ये प्रकृती जपून काम करा. दिवस बरा.
सिंह –
आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिकदृष्ट्या दिवस उत्तम.
कन्या –
समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. व्यय चंद्र शुक्र क्लेश घडवून आणेल. आर्थिक व्यय होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.
तूळ –
शुक्र घरामध्ये आवश्यक वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील. लक्ष द्या. प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक –
बुध कन्या राशीत वृश्चिक व्यक्तींना चांगली संधी आणेल. फायदा घ्या. प्रयत्न पूर्वक शांत रहा. नैराश्याचा झटका येऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. चंद्र गृह सौख्य, नोकरी यासाठी मध्यम फळ देईल.
धनू –
गुरू राहू घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणेल. भाग्य चंद्र शुक्र योग जीवनात घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. लेखनामध्ये यश मिळेल. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम दिवस.
मकर –
अष्टम स्थानात चंद्र शुक्र नोकरीसंबंधी संधी मिळेल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा. घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम.
कुंभ –
राशीतील शनी आणि सप्तम चंद्रशुक्र असून जोडीदाराची भेट होईल, असे संकेत देत आहे. आठवा मंगळ नातेसंबंध ताणलेले असून सामाजिक जीवनात कष्ट देईल. प्रवास योग येतील. दिवस बरा.
मीन –
राशी स्वामी शुभ आहे. गुरू-राहू मुळे सामाजिक, आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. प्रवास, बंधुभेट संभवते. षष्ठ चंद्र आहे. दिवस चांगला.
शुभम भवतू!!