भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज मंगळवार १७ आक्टोबर २०२३. रागावर ताबा ठेवा, यश मिळेल, मान-प्रतिष्ठा मिळेल, सौम्य बोला,महत्वाची कामे होतील

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज मंगळवार १७ आक्टोबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष :-
विरोधक कट करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विरोध व विरोधक ओळखून ठेवा. उत्तर सावधपणे घ्या. प्रतिष्ठा राहील.

वृषभ :-
महत्त्वाच्या कामात यश मिळेल. केस जिंकता येऊ शकते. बोलणे थोडे सौम्य ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.

मिथुन :-
प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. ओळखी होतील. संसारासाठी चांगली खरेदी कराल. सौम्यपणे बोला.

कर्क :-
नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. इतरांची चूक सुधारावी लागेल. कला क्षेत्रात कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

सिंह :-
मान-प्रतिष्ठा मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. धंद्यात मोठेे काम मिळेल. कठीण प्रश्न सोडवा.

कन्या :-
वाहन हळू, नीट चालवा. घरासंबंधी समस्या सोडवावी लागेल. वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. हिशोब नीट करा.

तूळ :-
कामाची गर्दी होईल. पाहुणे येतील. खाण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. अंदाज विचारपूर्वक घ्या.

वृश्चिक :-
महत्त्वाची कामे होतील. कल्पनाशक्तीचे कौतुक होईल. धंद्यात काम मिळेल. वसुली करा.

धनु :-
अडचणीत आलेले काम करून घ्या. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात चांगली सुधारणा होईल. मैत्री कराल.

मकर :-
मान-प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. नोकरी मिळेल. रागावर ताबा ठेवा. तुमची कामे होतील.

कुंभ :-
तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्यावर टीका होऊ शकते. क्षुल्लक कारणाने थकवा वाटेल.

मीन :-
ठरविलेले काम पूर्ण करा. घरातील वृद्ध माणसांची काळजी घ्यावी लागेल. धंद्यात वाद वाढवू नका.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!