भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज बुधवार १३ डिसेंबर २०२३,पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सामाजिक मन-सम्मान होतील,मानहानी संभवते,एखादी मनाविरुद्ध घटना घडेल, चांगली बातमी मिळेल, वक्तव्यावर संयम ठेवा, मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज बुधवार १३ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष –
१३ डिसेंबर, २०२३ बुधवार रोजी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार – व्यवसायात सावध राहावे लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. 

वृषभ –  
आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

मिथुन  –
 आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. 

कर्क  –
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. अपुरी कामे पूर्णत्वास जातील.

सिंह –
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल. धन व कीर्ती यांची हानी संभवते. संतती संबंधी एखादी काळजी निर्माण होईल. 

कन्या –
आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता आहे.

तूळ  –
आज शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. कुटुंबियांना आपल्यामुळे काही त्रास होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आपण तयार व्हाल.

वृश्चिक –
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. 

धनु –
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल.

मकर –
आजचा दिवस व्यापार – व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. 

कुंभ –
आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार – व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान – सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. 

मीन –
बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!