राशीभविष्य : आज बुधवार ३ जानेवारी २०२४, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो, प्रलंबित कामात यश मिळेल, नवीन शत्रू वाढतील, व्यवहारामुळे वाद होऊ शकतो
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज बुधवार ३ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष (Aries) :
आज कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टी विसरून कामावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा संपूर्ण दिवस मानसिक त्रास जाणवेल. कार्यक्षेत्रात मंदी जाणवू शकते. जमा झालेलं भांडवल खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारची बळजबरी करू नका. जे काही सहज मिळेल त्यात समाधानी राहा. अन्यथा काहीही शिल्लक राहणार नाही. नवीन कामाची रूपरेषा तयार करा. त्यावर लवकरच काम सुरू होईल; पण आज त्यावर काम करू नका. आवश्यक आणि मर्यादित बोललात तर कुटुंबात शांततेचं वातावरण राहील.
वृषभ (Taurus) :
दिवस संमिश्र फलदायी असेल. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे, परंतु, वडिलोपार्जित संपत्तीच्या कारणामुळे किंवा प्रतिष्ठेमुळे भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. घरात कमी आणि आवश्यक तेवढंच बोलणं फायदेशीर राहील. याउलट कामाच्या ठिकाणी संवादातून नफा मिळू शकतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आर्थिक लाभ होईल. चांगल्या आर्थिक स्थितीमुळे भविष्याबद्दल निश्चिंत असाल. नोकरदार व्यक्तींना सहकाऱ्यांच्या कामात दोष दिसेल. महिला गटाकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini) :
विचार त्रास देतील. क्षमतेपेक्षा जास्त इच्छा असतील आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दुःखी व्हाल. तुम्ही तुमचा राग इतरांवर काढल्याने आजूबाजूचं वातावरण बिघडेल. स्वभाव समाधानी राहील; पण रोजचं जीवन सामान्य राहील. आर्थिक बाबी वगळता इतर सर्व कामं तुमच्या बुद्धीने आणि विवेकाने यशस्वी होतील. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी विचारक्षमता इतरांपेक्षा चांगली असेल. तुमचं काम अपूर्ण राहिलं तरी इतरांचं काम काही वेळात पूर्ण कराल. कुटुंबात काही तरी कमतरता जाणवेल. आरोग्य काही काळ प्रतिकूल राहील.
कर्क (Cancer) :
दिवस अनुकूल असेल. कोणत्याही कामात जास्त मेहनत करावी लागणार नाही. सामाजिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुमचं काम इतरांपेक्षा जास्त आवडेल. आर्थिक लाभ होईल; पण अनावश्यक गोष्टींवर खर्च होण्याची शक्यता आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते. भावा-बहिणींसाठी तुम्ही जास्त फायदेशीर ठराल. इतरांना मदत करूनही संध्याकाळी तुमच्या हातात काही शिल्लक राहणार नाही. किरकोळ आजार वगळता शारीरिक स्वास्थ्य सामान्य राहील.
सिंह (Leo) :
दिवस चढ-उताराचा असेल. दिनचर्या व्यवस्थित कराल. फायदे मिळवण्यासाठी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला लाभ दिसेल; पण काही क्षणात आशा निराशेत बदलेल; पण काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत आर्थिक बाबींमध्ये समाधानकारक स्थिती निर्माण होईल. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आर्थिक लाभ होईल. पारंपरिक कामांमध्ये आज आराम करा अन्यथा नवीन संकटं निर्माण होतील. सरकारी काम किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर थोडे कष्ट घ्या म्हणजे लवकरच चांगले परिणाम दिसतील. अनियंत्रिततेमुळे भरकटत जाल.
कन्या (Virgo) :
आज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सन्मान मिळेल. तुमची मानसिकता थोडी बदलेल. जितका जास्त मान किंवा पैसा मिळेल तितकी तुमची भूक वाढत जाईल. कामाचं वातावरण सामान्य राहील. आवश्यकतेनुसार पैसे सहज उपलब्ध होतील; पण समाधान मिळणार नाही. संघर्ष करूनही अपयश मिळू शकतं. कौटुंबिक कारणास्तव घरात कोणाशी तरी जोरदार वाद होऊ शकतो. जमीन आणि घराशी संबंधित काम काही दिवस पुढे ढकलणं फायदेशीर ठरेल. अचानक राग आल्याने बुद्धी आणि विवेक नष्ट होईल. धर्मावर श्रद्धा असली तरी पुण्यकर्म करू शकणार नाही.
तूळ (Libra) :
आध्यात्मिक दृष्टिकोनातून दिवस चांगला जाईल. धर्मादाय कार्यात खर्च कराल; पण इतर कामात व्यग्रतेमुळे फार वेळ देऊ शकणार नाही. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेल्या परोपकाराचे परिणाम प्रतिकूल परिस्थितीत ही मिळतील. पैसे मिळण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल; पण मेहनतीचं फळ उशिरा मिळेल. पैशांबाबत विशेष काळजी घ्या. व्यवहारामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. परंतु, मुलांच्या कृतीमुळे त्रास होऊ शकतो. आंतरिक क्रोध कमी केल्यास आरोग्य चांगलं राहील.
वृश्चिक (Scorpio) :
दिवस चढ-उताराचा असेल. दिवसाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत परिस्थिती सर्व प्रकारचे अडथळे आणील. परंतु नंतर स्थिती सामान्य होईल. तब्येत हळूहळू सुधारत असल्याने अपूर्ण कामं पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित कराल. कामाची गती संथ राहील. मेहनतीचं फळ विलंबानं मिळेल किंवा दुसऱ्या दिवशी मिळेल. स्वभाव हट्टी होईल आणि अनुभवी लोकांचे योग्य शब्दही चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक स्थिती डळमळीत राहील. गरजेच्या वेळी पैशाच्या कमतरतेमुळे चिंता राहील. संध्याकाळी थोडं थकल्यासारखं वाटलं तरी दिवसाच्या तुलनेत बरं वाटेल.
धनू (Sagittarius) :
दिवस मध्यम फलदायी असेल. दिवसाच्या सुरुवातीला आळस राहील आणि सक्तीने काम कराल. दुपारचा वेळ धावपळीत जाईल; पण त्याचा विशेष फायदा होणार नाही. नोकरदार व्यक्ती जुनी कामं पूर्ण करण्यात अधिक व्यग्र राहतील. संध्याकाळी काम सुरू ठेवण्यासाठी पुरेसे पैसे मिळतील; पण रोजच्या खर्चाच्या तुलनेत ते कमी असतील. कौटुंबिक कामात विलंब झाल्याने घरात वाद होतील. आरोग्य चांगलं राहील. नवीन शत्रू वाढतील; पण ते तुमचं नुकसान करू शकणार नाहीत.
मकर (Capricorn) :
दिवस चांगला जाईल; पण जिद्दी स्वभावामुळे अडचणी येऊ शकतात. जे काम ठरवाल ते चुकीचं असो अथवा फायदेशीर, ते तुम्ही करालच. दुपारनंतरचा कालावधी तुलनेनं अनुकूल राहील. तुमचा निर्णय चुकीचा आहे असं म्हणणारे लोक तुमच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवतील. प्रलंबित कामात यश मिळू लागेल; पण स्वभाव गर्विष्ठ झाल्याने वर्तन अधिक रुक्ष होईल. आर्थिक लाभासोबत इच्छित कामं पूर्ण झाल्याने उत्साही असाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शारीरिक जोम कायम राहील.
कुंभ (Aquarius) :
संयम बाळगण्याची गरज आहे. घर किंवा कामात जुन्या उणिवा समोर आल्यास गडबड होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जे वाटतं, त्याच्या उलट प्रतिक्रिया मिळतील. वैयक्तिक व्यवहार असो अथवा व्यावसायिक गोष्टी नफ्यापेक्षा नुकसान दुप्पट होईल. गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्ताराच्या योजना पुढे ढकलणं चांगलं ठरेल. कोणत्याही कारणामुळे नुकसान होऊ शकतं. आज प्रवास टाळा. संध्याकाळपासून स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. घरातलं वातावरण असामान्य असेल.
मीन (Pisces) :
तुमचं लक्ष आणि दुपारपर्यंतचा वेळ अपूर्ण कामं पूर्ण करण्यात जाईल. अनपेक्षित प्रवासामुळे दिनचर्या विस्कळीत होईल. नोकरी-व्यवसायात अनेक वेळा फायद्याची अपेक्षा असेल; पण ती अचानक दुपारनंतरच पूर्ण होईल. लेखन किंवा बौद्धिक काम करणाऱ्यांसाठी दिवस संघर्षमय असेल. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी कुणाची तरी खुशामत करावी लागेल. घरी किंवा कामावर महिलांपासून सावध राहा. तापट स्वभावामुळे त्यांचा विनाकारण अपमान होऊ शकतो. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मान-सन्मान मिळेल; पण लाभ मिळणार नाही. गुप्त शत्रूंमुळे मानसिक चिंता राहील. तब्येत ठीक राहील.