भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

दिवसा उन्हाच्या झळा, उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा कायम

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात काही भागात उन्हाच्या झळा बसत असल्या तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र पहाटे गारठा कायम आहे, यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसू लागल्याने कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. तर उत्तरेतील काही जिल्ह्यात दिवसा उन्हाच्या झळा तर रात्रीच्यावेळी थंडी जाणवत आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानातील चढ- उतार सुरूच आहेत.

राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता वाढत असतानाच उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा देखील कायम आहे. आज (ता. 24) कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात काही भागांत अंशतः ढगाळ हवामान असले, तरी स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत उन्हाळा वाढला आहे.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच गुरुवारी (ता. २३) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 7 अंश सेल्सिअस, तर धुळे येथे 8.4 अंश, तर जळगाव येथे 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात किमान तापमान 12 अंशांच्या पुढेच होते. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गारठा असलेली ठिकाणे : निफाड 7, धुळे 8.4, जळगाव 9.3.

उष्णता अधिक असलेली ठिकाणे : अकोला 38.5, वाशीम 37.8, ब्रह्मपुरी 37.2, नांदेड 37.3, वर्धा 37, सोलापूर 37.4, नागपूर 36.8, जळगाव 36.6, अमरावती 36.4, चंद्रपूर 36.5, सांगली 36.3, यवतमाळ 36.2, परभणी 36.1, गोंदिया 36.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!