उन्हाचे चटके : राज्यातील पाच जिल्ह्यांत एप्रिल महिन्यातच पारा चाळीशीपार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ठाणे ,पुणे, जळगाव, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यातही पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत तापमानही वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात वर्ध्यामुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।तील तापमान ३९.९ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील १५ दिवस पूर्ण झालेले नसतानाही मे महिन्यासारख्या उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आरोग्य विभागाकडून उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाय करावेत असं आवाहन करण्यात आले आहे. मात्र राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे येणाऱ्या काळात महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत असून मागील आठ ते दहा दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे नुकसान झाले असून काढणी केलेला कांदा जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत वातावरणात अनेक बदल होताना दिसत आहेत. अवकाळी पावसामुळे नागरीक त्रस्त असताना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मुंबईतील ठाणे शहरात बुधवारी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे मुंबईकरांचा घामटा निघाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराचे तापमान चाळिशी पार गेले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. नागरीकांना प्रचंड उन्हाचा सामना करावा लागत आहे.