राज्यात आजही पाऊस, या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटास पाऊस हजेरी लावणार
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. अशात शेतमालाचं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. आता आजही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस हजेरी लावणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा,गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटास पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही तुरळक ठिकाणी अति हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भातही अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ मार्चनंतर राज्यातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशातच पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपीट होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसेच नगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी तुफान गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
आज, सोमवारी मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.