महाराष्ट्रराजकीय

आम्ही तोंड उघडलं तर…गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरे ना इशारा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेच्या व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरलेले असतानाच शिंदे गटाकडून थेट ठाकरे घराण्यावर टीका करत इशारा देण्यात आला. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट आदित्य ठाकरे यांनाच इशारा दिलाय.

त्यांनी म्हटलेय की.आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरावा की नाही हे आम्हाला बोलण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. आदित्य ठाकरे यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही जेव्हा राजकारण सुरू केलं. तेव्हा आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नसेल. त्यांनी सांभाळून बोलावं. नाही तर आम्ही तोंड उघडलं तर पळावं लागेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!