CET बरोबर १२ वी च्या गुणांनाही महत्व,राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विद्यार्थ्यांना आता CET बरोबर १२ वीचे मार्क्स महत्त्वाचे असणार आहेत. सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आली होती. यानंतर आता या परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेबाबत मोठी माहिती दिली आहे.महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे
सीईटीचा निकाल पुढील वर्षापासून १ जुलै रोजी लागेल तर सत्र १ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण कमी वाटत असतील अशा विद्यार्थ्यांना केंद्र सकारच्या परीक्षांप्रमाणे पुन्हा परीक्षा देण्याची संधी असेल. यामध्ये त्यांना अधिक गुण मिळवता येणार आहेत अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी CET च्या मार्कांवर प्रवेश दिला जातो. परंतु आता बारावीच्या मार्कांवर आणि सीईटीच्या मार्कांवर प्रवेश देण्यात येणार आहे. बारावीमधील ५० टक्के गुण आणि सीईटीमधील ५० टक्के गुण अशा मार्कांवर पदवीमध्ये प्रवेश देण्यात येईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून बारावीच्या गुणांनाही महत्त्व राहणार आहे. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू असणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सीईटी परीक्षा ३ तदे १० जून या महिन्यात होणार आहेत. तर जेईई आणि नीट परीक्षा असल्यामुळे सीईटीची परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक सारखे होत असल्यामुळे सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली होती.