भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराष्ट्रीय

चलनातून बाद केलेल्या २००० च्या नोटां संदर्भात रिझर्व्ह बँकेची महत्वाची माहिती

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून हटविण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आतापर्यंत २००० रुपये मुल्यांच्या एकूण ९३ टक्के नोटा बॅंकांमध्ये परत आल्या असल्याची महत्वाची माहीती भारतीय रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी जाहीर केली आहे. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत बॅंकात नागरिकांनी जमा केलेल्या २००० रुपयांचे नोटांचे एकूण मुल्य ३.३२ लाख कोटी रुपये इतके आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बॅंकांत जमा करण्याची किंवा अन्य मुल्य वर्गाच्या नोटांत बदल्याचे आवाहन केले आहे. चलनातून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंका परत करण्यासाठी अजून एक महिन्याचा अवधी आहे. परंतू जवळपास ९३ टक्के दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंकात परत आल्याने खूपच कमी नोटा चलनात राहील्या आहेत.

आता नोटा बदलविण्यासाठी आता केवळ १ महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे.वेळेत तुम्ही तुमच्या कडे असलेल्या दोन हजाराच्या नोटा बदलवून घेतल्या नाही तर नंतर तुमच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत. आरबीआयच्या निर्णयानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० हजारांच्या नोटाच कोणताही फॉर्म न भरता बदलून घेऊ शकते. बदलून घेताना कोणत्याही प्रकारे ओळखपत्र देण्याची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!