भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महत्त्वाची बातमी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता दिवाळीतच?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीतच होतील अशी शक्यता आहे. याबाबत माहिती राज्याच्या नगरविकास आणि ग्रामपंचायत विभागा कडून मिळाली. सरकारने प्रशासकांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी नियोजन केल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि १४ महापालिकांच्या निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील २५  जिल्हा परिषदा, १४ महापालिका आणि २८४ पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. देशात एप्रिल २०२४ मध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. 

आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यास निवडणुका जूनपर्यंत पुढे जातील. त्यानंतर पावसाळा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीतच होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांनी या निवडणुका घेण्याची मागणी केली. महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान दिले आहे.

महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती ?
शिंदे गट आणि भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस यांना काहीही करुन मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे. याबाबत मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिंदे गटाने मुंबई महानगर महापालिकेवर विजय मिळवता यावा या दृष्टीने विभाग प्रमुखांची निवड करुन त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. तसे नियोजन आहे. त्यामुळे या निवडणुकात पुढे ढकलण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विरोधकांनी तसा आरोपही केला आहे.

दरम्यान, गेले कित्येक वर्ष ठाकरे गटाची एकहाती सत्ता मुंबई महापालिकेवर आहे. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे देखील मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी घेताना दिसत आहे. हे सर्व सुरु असताना निवडणुकी कधी होणार आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी महानगर पालिका, नगर परिषदांच्या मुदती संपल्या आहेत पण अद्याप निवडणूक जाहीर होण्याची चिन्हे दिसत नाही. आता पुन्हा तीन महिने या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!