शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; पीएम किसान सन्मान निधीमध्ये होणार वाढ ?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत असून केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबियांना चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला तीन टप्प्यात ६ हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात दिले जातात. त्यामध्ये वाढ करण्याची शक्यता असल्याची माहिती एका वेबसाईटनं दिली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानाच्या कार्यालयासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारकडून हा प्रस्ताव मान्य केल्यास पीएम किसान सन्मान निधी योजनेत २० हजार ते ३० हजार करोड़ रुपयांचा खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर हा सुध्दा एक प्रश्न आहे की, हा प्रस्ताव प्रत्यक्षात कधी येणार हे निश्चित नाही. पण असं म्हटलं जात आहे की, चार राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याच्या आगोदर हा निर्णय घेण्यात येणार आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि तेलंगाना या राज्यात यावर्षी निवडणुका होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात अधिक शेतकरी आहेत. त्याचबरोबर उत्पादन घेण्यात सुध्दा शेतकरी त्या राज्यात अग्रेसर आहे. त्याच्या खालोखाल राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्य आहेत. या राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुक होण्याची शक्यता आहे. समज केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्याचबरोबर सध्या सत्तेत असलेल्या सरकारला सु्ध्दा त्याचा फायदा होईल.