भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर तर बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे.

दरम्यान, दहावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु, आता २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढवण्यात आली आहे. तर बारावी बोर्ड परीक्षेसाठी याआधीची ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु, आता बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आवेदन पत्र विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावी बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक असून बोर्डाकडून निश्चित वेळापत्रक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!