भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राणा दाम्पत्याचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा निर्णय अखेर मागे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण तापले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली आहे. आता मात्र राणा दाम्पत्याने थेट माघार घेत आपलं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या २४ तारखेला मुंबई दौरा करणार आहेत. मोदीजी आपल्या देशाचा गौरव आहेत, त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून आपण मातोश्रीवर जाण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचे रवी राणा यांनी म्हंटल. आमच्यावर कोणाचा दबाव नाही, आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी संगीतले

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीस पठण करणार होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येव्हडच नव्हे तर राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाला शिवसैनिकांनी वेढा घातला होता. या संपूर्ण प्रकरणावरून मुंबईत वातावरण चिघळले होते. अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!